ज्योती मल्होत्राची खासगी डायरी तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. या डायरीत महत्त्वाची माहिती मिळाल्याचं बोललं जातं. डायरीत ज्योतीच्या नोंदींचा तपास केला जात आहे. त्याचसोबत या डायरीत काही औषधांचा उल्लेख आहे, ही औषधं कसली आहे. त्याचा वापर कुठल्या आजारांसाठी होतो. याचा हेरगिरीशी काही संबंध आहे का या अँगलने सध्या तपास सुरू आहे. डायरीत एका पानावर I LOVE YOU असं लिहिल आहे. हे तिने कुणासाठी लिहिलं की I LOVE YOU आणि औषधांची नावं हा काही कोडवर्ड आहे याबाबत विशेष तपास यंत्रणांकडून शोध सुरू आहे...
advertisement
डायरीत नेमकं काय लिहलय?
पाकिस्तानातील 10 दिवसांची सहल पूर्ण केल्यानंतर आज मी माझा देश भारतात परत आलेय. यावेळी पाकिस्तानी जनतेचं खूप प्रेम मिळालं. माझे सबस्क्रायबर आणि मित्रही तिथे भेटण्यासाठी आले. लाहोर फिरण्यासाठी मिळालेला 2 दिवसांचा वेळ खूप कमी होता. सीमारेषेवरील हा दुरावा माहित नाही कधीपर्यंत कायम राहणार मात्र हृदयात जे राग रुसवे आहेत ते संपून जावेत. आपण सर्व एकाच भूमीचे एकाच मातीचे आहोत, असं काही असेल जे मी व्हिडिओत शेअर केलं नसेल तर तुम्ही मला बिनधास्त कॉमेंटमध्ये विचारु शकता.आता परवानगी द्या....पाकिस्तानी सीमा इथपर्यंतच होती. पाकिस्तानी सरकारला एक विनंती आहे की भारतीयांसाठी आणखी काही गुरुद्वारा आणि मंदिरांचे रस्ते उघडण्यात यावेत..सुविधा निर्माण करण्यात याव्यात जेणेकरुन ते इथे भेट देऊ शकती.तिथल्या मंदिरांना संरक्षण द्या आणि ज्यांचे कुटुंबिय 1947 मध्ये वेगळे झाले त्यांना भेटण्याची परवानगी मिळावी...पाकिस्तानविषयी जितकं बोललं जाईल तितकं कमी आहे. क्रेझी आणि कलरफुल