भारताच्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानचे धाबे दणाणलंय. याला प्रत्युत्तर देण्यासाठी उडालेल्या पाकिस्तानचं लढाऊ विमान भारताने पाडले आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं जेएफ 17 हे लढाऊ विमान पाडले. अखनूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्यानं हे पाकिस्तानचं विमान पाडले. याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा पायलट वेदनेनं विव्हळत असल्याचे दिसत आहे. स्थानिकांकडून या पाकिस्तानी पायलटला घेरलं असून प्रथमोपचा करत असल्याचे दिसून आले आहे. तर, स्थानिकांमधून आणखी एका जखमी पायलटचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे दोन पायलट भारताच्या हद्दीत असल्याची माहिती आहे.
advertisement
भारतीय सैन्याने एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. भारतीय सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांच्या केंद्रावर हल्ला केला. भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी मसूदचे कुटुंबीय ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांना लक्ष्य केलं. यामध्ये लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर ठार झाला या चर्चांना उधाण आलंय. जैशचा बहावलपूर इथला तळ भारताच्या हल्ल्यात उद्धवस्त करण्यात आला. बहावरपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आहे. भारतीय सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या याच ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो.