आग्रा : आग्रा येथील तरुणी कल्पना ठाकुर (Kalpana Thakur Agra) हिने गायलेल्या गाण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्तुती केली आहे. यामध्ये 'मेरा पहला वोट, मेरे देश के लिए…’ असे गाणे तीने म्हटले आहे. हा व्हिडिओ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे.
मतदारांना लोकसभा निवडणुकीत सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आग्रा येथील गायिका कल्पना ठाकूर हिने हे गीत गायले आहे. हा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गीतामध्ये तरुणांनी विशेषत: प्रथमच मतदारांनी मतदानाच्या या महान उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
लोकसभा निवडणूक 2024 ची घोषणा झाल्यापासून, शिक्षण मंत्रालय, प्रसार भारती, आकाशवाणी उत्तर प्रदेश यासारख्या अनेक विभागांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये आग्राची कन्या कल्पना ठाकूर हिने गायलेल्या गीताचाही समावेश आहे. प्रसारित होत असलेले देशभरातील गायकांनी गायलेले हे चार ओळींचे गाणे सरकारने प्रसिद्ध केले. ‘मेरा पहला वोट, मेरे देश के लिए…’ नावाच्या या गाण्याला आग्राच्या नामनेर येथील रहिवासी गायिका कल्पना ठाकुरने अशा पद्धतीने गायले की, स्थानिक स्तरापासून केंद्रीय शिक्षण मंत्रालयापर्यंत त्याचे कौतुक झाले.
गायनात करिअर करायची इच्छा -
दरम्यान, या गाण्यामध्ये चर्चेत आलेली कल्पना ठाकुर ही मूळ जगनेरच्या सरैंधी गावातील रहिवासी आहे. सध्या ती आग्राच्या बैकुंठ गर्ल्स कॉलेजमध्ये संगिताचे शिक्षण घेत आहे. तिचे वडील कैलाश चंद हे शेतकरी तर आई पुष्पा देवी गृहिणी आहेत. तसेच दोन मोठ्या बहिणी आणि दोन लहान भाऊही तिला आहेत. 2017 मध्ये ती गायनात करिअर करण्यासाठी आग्रा येथे आली होती. कल्पनाला लोकगीते आणि संगीताची खूप आवड आहे. त्यामुळे तिला भविष्यात संगीतातच करिअर करायचे आहे.
नोकरी मिळाली नाही म्हणून केली टोमॅटोची शेती, आज नोकरी करणाऱ्यांपेक्षा गडी कमावतोय जास्त पैसे
लोकल18 सोबत बोलताना त्यांनी सांगितले की, माझा व्हिडिओ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केला आहे, यावर माझा विश्वास बसत नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझा व्हिडिओ ट्विट केल्यावर गावातील नातेवाईक आणि कॉलेजच्या शिक्षकांपर्यंत सर्वांनी फोनवरून माझे अभिनंदन केले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आहे. याशिवाय अनेक ठिकाणांहून ऑफर्सही येत आहेत, असे तिने सांगितले.