सुंदर मुलं आपल्या टार्गेटवर असायची, असा जबाब महिलेने पोलिसांना दिला आहे. या महिलेने तिच्या मुलासह 3 चिमुरड्यांचं आयुष्य संपवलं आहे. या तीनही मुलांचा मृत्यू योगायोग असल्याचं सुरूवातीला नातेवाईकांना वाटलं, पण आता मात्र या सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. 1 डिसेंबरला घरातल्या स्टोअर रूममध्ये असलेल्या पाण्याच्या टबमध्ये विधी नावाच्या मुलीचा मृतदेह मिळाला होता. विधी तिच्या कुटुंबासह नौल्था गावात लग्नाला आली होती.
advertisement
सायको किलर महिलेला अटक
मुलांची हत्या करणाऱ्या या सायको किलर महिलेला अटक करण्यात आली आहे. हरियाणाच्या पानिपतमध्ये घडलेल्या या घटनेमुळे देशभरात खळबळ माजली आहे. पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात पानिपत पोलिसांना मुलीच्या हत्येप्रकरणात मोठं यश मिळालं. नौल्था गावात 6 वर्षांच्या विधीची हत्या झाल्यानंतर फक्त 36 तासांमध्येच पानिपत पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
मुलांना बुडवून मारलं
महिलेने आतापर्यंत चार मुलांची हत्या केली आहे, ज्यात तिचा एक मुलगाही आहे. या सर्व मुलांना महिलेने बुडवून मारलं आहे. आरोपी महिला सिवाह गावातली आहे. सोनीपत जिल्ह्यातील बोहड गावामध्ये तिचं लग्न झालं होतं. महिलेला आज कोर्टात नेण्यात आलं, यानंतर आता तिला अधिक तपासासाठी रिमांडमध्ये पाठवण्यात आलं आहे.
