याबाबत आता राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या राज कुशवाहच्या बहिणीची प्रतिक्रिया समोर आली आहे. आपला भाऊ निर्दोष आहे. तो असं करूच शकत नाही, असा दावा तिने केला आहे. शिवाय तिने सोनम आणि राजच्या रिलेशनबाबत खोटी थेअरी मांडली जात असल्याचा देखील दावा केला आहे.
माझा भाऊ सोनमला दिदी म्हणायचा- राज कुशवाहची बहीण
advertisement
"माझा भाऊ हे करूच शकत नाही. राजला या कटात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो अजिबात कुणाची हत्या करू शकत नाही. सोनमसोबतच्या प्रेमसंबंधाबाबत विचारलं असता राजच्या बहिणीने भलताच खुलासा केला आहे. 'माझा भाऊ सोनमसोबत रिलेशनशिपमध्ये कसा काय असू शकतो? तो सोनमला दीदी म्हणायचा. दोघांमध्ये नोकर-मालकाचे नाते होते. अशा परिस्थितीत दोघेजण प्रेमसंबंधात होते, अशी थेअरी कशी काय मांडू शकता? असा सवालही राजच्या बहिणीने विचारला आहे.
आरोपी राज कुशवाहाच्या बहिणीने पुढे म्हटलं की, 'माझा भाऊ राजला फसवण्यात आले आहे. माझा भाऊ हे करू शकत नाही. माझा भाऊ अडीच वर्षांपासून तिथे काम करत होता. परवा माझा भाऊ सकाळी ६ वाजता आला. त्याने सांगितले की त्याला नवीन कपडे घालून मंदिरात जायचे आहे. आम्ही राजा भैयाच्या (राजा रघुवंशी) भावाला विनंती करतो की, त्यांनी माझ्या भावाला (राज कुशवाह) वाचवावं. तो निर्दोष आहे.