हवाला व्यवहारात सोनमचं कनेक्शन उघड
दरम्यान, आता सोनम आणि तिचा प्रियकर राज याच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. दोघंही जण एका बेकायदेशीर कामात गुंतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. त्यामुळे एकीकडे राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असताना, आता या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची एन्ट्री झाली आहे. सोनम आपला प्रियकर राजसोबत हवाला व्यवहारात गुंतल्याचं पोलीस तापासात समोर आलं आहे. याबाबतची कबुली स्वत: राजने दिल्याचं देखील समजत आहे.
advertisement
हवालासंबंधी पुरावा काय आढळला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुशवाहाच्या मोबाईलवरून हवाला व्यवहारांशी संबंधित काही पुरावे सापडले आहेत. पोलिसांना राजच्या फोनमध्ये दहा रुपयांच्या नोटांचे काही फोटोही सापडले आहेत. या फोटोंचा वापर विशेष कोडवर्ड म्हणून केला जात असल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान राजने कबूल केले की, तो सोनम आणि गोविंदसोबत हवाला पैसे ट्रान्सफर करत असे.
गोविंद रघुवंशीचा श्री बालाजी अॅक्टोरियोच्या नावाने प्लायवूड आणि लॅमिनेशनचा व्यवसाय आहे. त्यांचे कार्यालय इंदूरमधील मंगल सिटी येथील मॉलमध्ये आहे, तर गोदाम समरपार्क (कमल विहार) निपानिया परिसरात आहे. गुन्हे शाखेने हवाला आणि रोख व्यवहारांशी संबंधित संपूर्ण माहिती ईडीकडे सोपवली आहे. आता गोविंदशी संबंधित जितेंद्र रघुवंशी यांच्या बँक खात्यांचीही चौकशी केली जात आहे, ज्याद्वारे सोनमने व्यवहार केले होते. यामुळे पती राजा रघुवंशी प्रकरणात अडकलेली सोनम रघुवंशी ही साधी सरळ महिला नाही, तर ती पक्की खिलाडी असल्याचं देखील सांगितलं जात आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.