मेघालय पोलिसांचे डीआयजी डीएनआर मार्क यांनी सोनमच्या मंगळसूत्राबद्दल महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, सोनमने तिचे मंगळसूत्र हॉटेलमध्येच ठेवले होते. ज्यावेळी पोलिसांनी रघुवंशी जोडपं राहत असलेल्या होम स्टेच्या रुमची झडती घेतली. तेव्हा रुममध्ये ठेवलेल्या सुटकेसमध्ये अंगठी आणि मंगळसूत्र सापडले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. कारण नवविवाहित महिलेने तिच्या हनिमूनदरम्यान तिचे मंगळसूत्र का काढल असेल?" या संशयानंतर पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला. यानंतर हे सगळं कांड उघडकीस आलं.
advertisement
सोनम आणि इतर चार आरोपी वेगवेगळ्या कोठडीत बंद
सोनमचे कथित प्रेमी राज कुशवाह आणि आकाश राजपूत यांना सदर पोलीस ठाण्याच्या एका कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर विशाल सिंग चौहान आणि आनंद सिंग कुर्मी यांना दुसऱ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी सोनमला जेवण दिले होते. तिने जेवणही केलं होतं. न्यायालयात हजर होण्यापूर्वी आणि नंतर ती खूपच शांत दिसत होती. आरोपींच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी सदर पोलीस ठाण्यात आणि सर्व कोठडीत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
आरोपीच्या हालचालींबद्दल पोलिसांनी कोणती माहिती दिली
घटनेनंतर आरोपींचे ठिकाण आणि हालचालींचाही पोलीस तपास करत आहेत. हत्येनंतर आरोपी शिलाँगहून गुवाहाटी, नंतर इंदूर आणि शेवटी गाजीपूरला गेला. या संदर्भात, जेव्हा अतिरिक्त एसपींना विचारण्यात आलं, तेव्हा पोलिसांनी हा एक विशेष हालचालींचा पॅटर्न आहे. याबाबत अजून तपास होणं बाकी आहे. हा तपास जसजसा पुढे जाईल तसतसा आपल्याला याबाबत अधिक माहिती मिळेल. ही हालचाल नियोजित होती की फक्त पळून जाण्याचा प्रयत्न होता, हेही समजू शकेल, असंही पोलिसांनी सांगितलं.