राजा आणि सोनम तिथे पोहोचण्यापूर्वीच मारेकरी शिलाँगला पोहोचले होते, असे सांगण्यात येत आहे. आता सोनम आणि राज यांच्यात झालेला संवादही समोर आला आहे. ज्यातून आणखी मोठे खुलासे होत आहेत. सोनम सतत राजवर दबाव टाकत होती. त्याला ब्लॅकमेल करत होती, अशीही माहिती समोर आली आहे.
सोनम राजला कशी ब्लॅकमेल करायची?
राजा रघुवंशी हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या एसआयटी पथकाला राज आणि सोनममध्ये झालेला संवाद हाती लागला आहे. सोनम पती राजा रघुवंशीच्या हत्येसाठी राजला ब्लॅकमेल करत होती, असे सांगण्यात येत आहे. लग्नाच्या फक्त २ दिवसांत सोनमने राजला राजाला मारण्यासाठी मेसेज केला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. एसआयटीला मिळालेल्या राज आणि सोनम यांच्यातील चॅटमधून एक धक्कादायक खुलासा झाला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने १३ मे रोजी राजला मेसेज केला होता. त्यात तिने लिहिलं होतं, 'मी थकली आहे, त्याला (राज रघुवंशीला) मारून टाक, नाहीतर मी मरेन.' ही महत्त्वाची माहिती राजने स्वतः पोलीस चौकशीत दिली आहे. यापूर्वी राजाचा मोठा भाऊ विपिननेही हीच गोष्ट सांगितली होती. चॅटमधून हा खुलासा समोर आल्याने आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोनम आणि इतर चार आरोपी वेगवेगळ्या कोठडीत बंद
सोनमचे कथित प्रेमी राज कुशवाह आणि आकाश राजपूत यांना सदर पोलीस ठाण्याच्या एका कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर विशाल सिंग चौहान आणि आनंद सिंग कुर्मी यांना दुसऱ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी सोनमला जेवण दिले होते. तिने जेवणही केलं होतं. न्यायालयात हजर होण्यापूर्वी आणि नंतर ती खूपच शांत दिसत होती. आरोपींच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी सदर पोलीस ठाण्यात आणि सर्व कोठडीत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.