पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाह आणि इतर ३ आरोपींसह तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचला होता. या संपूर्ण प्रकरणात इंदूर आणि शिलाँग पोलीस संयुक्त कारवाई करत हत्याकांडाचा उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोनमसह तिचे साथीदार विशाल सिंग, आनंद कुर्मी, आकाश राजपूत यांनाही मध्य प्रदेशातून अटक केली. या हत्याकांडाचा मास्टरमाइंड राज कुशवाह याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्याची माहिती आहे. पण याची अद्याप पुष्टी करण्यात आली नाही.
advertisement
राजा रघुवंशीवर पहिला वार कुणी केला?
पोलीस प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आनंद याने राजावर पहिला वार केला होता. सोनम ही हत्येचा मास्टरमाइंड राज कुशवाहाच्या संपर्कात सातत्याने होती. पोलीस सोनमचे कॉल रेकॉर्ड तपासले असता. तिचं राज कुशवाह सोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचं समोर आलं. कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी आरोपी राजला पकडल्याची माहिती आहे. विक्की ठाकूर, आनंद, आकाश आणि राज कुशवाह हे या संपूर्ण प्रकरणात आरोपी आहेत.
माझी मुलगी निर्दोष- सोनमच्या वडिलांची प्रतिक्रिया
सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंह यांनी म्हटले आहे की त्यांची मुलगी सोनम निर्दोष आहे. एवढेच नाही तर त्यांनी मेघालय पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणतात की, हे लग्न दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने झालं. मेघालय सरकार पहिल्या दिवसापासून खोटे बोलत आहे. माझी मुलगी काल रात्री गाजीपूरमधील एका ढाब्यावर आली आणि तिच्या भावाला फोन केला. पोलिस ढाब्यावर गेले आणि तिथून तिला घेऊन गेले. मी माझ्या मुलीशी बोलू शकलो नाही. माझी मुलगी असे का करेल, तिच्या पतीला का मारेल? मेघालय पोलिस पूर्णपणे खोटे बोलत आहेत. मी गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआय चौकशीची विनंती करतो. माझी मुलगी १०० टक्के निर्दोष आहे.