लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांनी...
विपिनने पुढं सांगितलं की, लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांनी सोनम आणि राजा एका दुसऱ्या लग्नासाठी गेले होते. तिथे राजाने आपल्या कुटुंबीयांकडे तक्रार केली की, सोनम त्याच्याशी बोलत नाहीये आणि एका कोपऱ्यात मोबाईलमध्ये व्यस्त आहे. राजाला सोनमचे हे वागणे अजिबात आवडले नसल्याचेही त्याने सांगितले. मात्र, कुटुंबीयांनी त्याला समजावले की नवीन लग्न आहे, हळूहळू सर्व काही ठीक होईल.
advertisement
राजाच्या हत्या केली तर मंगळ दोष संपेल
दरम्यान, या प्रकरणात विपिनने सर्वात धक्कादायक दावा सोनमच्या मंगळ दोषाबद्दल केला आहे. सोनमचा मंगळ दोष खूप प्रभावी होता आणि तिला वाटत होते की राजाच्या हत्येने तिचा मंगळ दोष संपेल, असे विपिनचे म्हणणे आहे. विपिनच्या दाव्यानुसार, सोनमने आधीच योजना आखली होती की राजाच्या हत्येनंतर ती राज कुशवाहाशी विधवा म्हणून लग्न करेल, जेणेकरून कोणीही तिच्यावर संशय घेऊ नये. पोलिसांनी आता या सर्व दाव्यांची गांभीर्याने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.