कोट्यवधींचा व्यवसाय कसा उभारला?
सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. काही वर्षांपूर्वी ते इंदूरमधील गोविंद नगर येथे राहायला आले. त्यांनी सुरुवातीला एक पिठाची गिरणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी प्लायवूड व्यवसायात पाय ठेवले. सुरुवातीच्या काळात त्यांना या व्यवसायात अनेक अडचणी आल्या. आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. पण त्यांनी ३५ लाख रुपयांची गुंतवणूक करून पुन्हा कंपनी उभारली. ही कंपनी आज इंदूरमधील मंगल सिटीमध्ये "बालाजी प्लायवुड" म्हणून ओळखली जाते. ज्यामध्ये सोनम आणि तिचा भाऊ गोविंद रघुवंशी मुख्य भूमिका बजावतात.
advertisement
वडीलांचा उद्योग वाढवण्यात सोनमचाही वाटा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम आणि तिचा गोविंद यांचाही वडिलांची संपत्ती वाढवण्यात हात आहे. दोघांनी मध्य प्रदेशासह गुजरात आणि महाराष्ट्रात देखील प्लायवूड व्यवसायाचा विस्तार केला होता. सोनमच्या कुटुंबाने अलीकडेच इंदूरमध्ये ४००० चौरस फूट क्षेत्रफळाचे एक मोठे गोदाम भाड्याने घेतलं होतं. एकेकाळी अतिशय साधे जीवन जगणाऱ्या कुटुंबाकडे आता कोट्यवधींची मालमत्ता आहे.
नातेवाईकांच्या नावावर बँक खाती, लाखोंचे व्यवहार
सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे सोनमने तिच्या अशिक्षित नातेवाईकांच्या नावावर विविध बँक खाती उघडली. यापैकी तिचा चुलत भाऊ जितेंद्र रघुवंशी यांच्या नावावर चार खाती होती, ज्यातून लाखो रुपयांचे व्यवहार होत होते. इतकेच नाही तर सोनमने राज कुशवाहाच्या आईच्या नावावर बँक खाते देखील उघडले होते. पोलीस सूत्रांचा दावा आहे की या खात्यांचा वापर हवाला व्यवहारांसाठी केला जात असल्याचा संशय आहे. मेघालय पोलीस आता या खात्यांचं तांत्रिक विश्लेषण करत आहे.