28 वर्षीय मंजूनाथ ईरप्पा कुम्भार, सामना संपल्यानंतर मध्यरात्री संगोळी रायन्ना सर्कलवर मॅच जिंकल्याचं सेलिब्रेशन करत असताना अचानक खाली कोसळला. त्यांच्या मित्रांनी त्याला बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूरमधील जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं.
मंजूनाथ RCB चा खूप मोठा फॅन होता. त्याने खा, IPL फायनल सामन्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर आयोजित केलं होतं. त्याने अवरडी वॉरियर्स या नावाने क्रिकेटची टीमही तयार केली होती. तो क्रिकेटचे सामने देखील आयोजित करायचा. मंजूनाथच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात त्याची 6 वर्षांची चिमुकली मुलगी, गर्भवती पत्नी, आई आणि वडील असा परिवार आहे. मंजू नाथ घरी परतण्याऐवजी त्याचा मृतदेह घरी परतल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मित्रांनी घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर कुटुंब कोलमडून गेलं.
advertisement
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या आयपीएल विजयाच्या जल्लोषादरम्यान, स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि 33 जण जखमी झाले. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं . त्यांनी सांगितले की, मैदानावरील जल्लोषाबद्दल बोर्डाला कोणतीही पूर्व माहिती नव्हती. त्यांनी ही दुर्घटना दुर्दैवी आणि हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे. केएससीएने प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. कर्नाटक राज्य सरकारनेही प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.