TRENDING:

एक क्षणात सगळं संपलं, डोळ्यादेखत मृत्युचा तांडव, लग्नाचं वऱ्हाड दरीत कोसळलं

Last Updated:

११ लोकांना घेऊन जाणारी एक अर्टिगा कार अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लग्नाच्या मिरवणुकीतून घरी परत जात असताना घात झाला. एका क्षणात सगळं संपलं, आनंद मावळला आणि मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. 11 वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेली गाडी थेट दरीत कोसळली. किचाळण्याचे आवाज आणि जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 7 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
News18
News18
advertisement

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी अपघात झाला. लग्नाचा आनंद आणि उत्साह मनात घेऊन जाताना 11 जणांना काय माहित होते की पुढच्याच क्षणी त्यांच्यासोबत काय अनर्थ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ लोकांना घेऊन जाणारी एक अर्टिगा कार अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 7 वऱ्हाडी गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

advertisement

मझिला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसुमा गावातून भुप्पा पुरवा मोडजवळ ही दुर्घटना घडली. शाहाबादचे सीओ अनुज मिश्रा यांनी सांगितले की, पाली येथील पटियानीम येथील नीरजचे वऱ्हाड कुसुमा गावाला गेले होते. लग्नाहून परत येत असताना वऱ्हाडाच्या गाडीला हा अपघात झाला.

अपघातानंतर आसपासच्या लोकांनी आणि रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी आरडाओरड ऐकून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारची काच तोडून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने जखमी लोकांना सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) शाहाबाद येथे दाखल केले, जिथे उपचारादरम्यान 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

advertisement

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जखमींची प्रकृती गंभीर आहे, ज्यांना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

मराठी बातम्या/देश/
एक क्षणात सगळं संपलं, डोळ्यादेखत मृत्युचा तांडव, लग्नाचं वऱ्हाड दरीत कोसळलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल