व्लादिमीर पुतिन यांना अनेकदा "आइस मॅन" किंवा कडक चेहऱ्याचा नेता म्हणून ओळखलं जातं. विशेषतः युक्रेन युद्धानंतर, त्यांच्या सार्वजनिक उपस्थितीत नेहमीच बचावात्मक किंवा आक्रमक भूमिका दिसून आली आहे. पण आज दिल्लीतील दृश्य वेगळं होतं. विमानतळावर आगमन झाल्यानंतर भारतीय पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं.
त्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विमानतळावर पुतीन यांचं स्वागत करण्यासाठी पोहोचले. यावेळी सर्व प्रोटोकॉल तोडून पुतीन यांना मिठ्ठी मारून मोदी यांनी त्यांचं स्वागतं केलं. औपचारिक हस्तांदोलनाचे रूपांतर लगेचच मनापासूनच्या आलिंगनात झालं.
विमानतळावरील सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे तो क्षण जेव्हा दोन्ही नेते त्यांच्या अधिकृत बुलेटप्रूफ लिमोझिनमध्ये जाण्याऐवजी (पुतिनच्या 'ऑरस' किंवा मोदींच्या 'मेबाख' सारख्या) गाड्यातून गेले नाही. यावेळी दोन्ही नेते एका सामान्य पांढऱ्या टोयोटा फॉर्च्युनरमध्ये गेले. हे दृश्य स्वतःच एक ब्रेकिंग न्यूज होतं. सुरक्षा प्रोटोकॉलनुसार हे अत्यंत दुर्मिळ आहे. फोटोमध्ये पुतिन मागच्या सीटवर बसून हसताना आणि पंतप्रधान मोदी त्यांच्या शेजारी बसलेले स्पष्टपणे दिसत आहेत. पुतिननेही कारमधून हात हलवला. देहबोलीच्या बाबतीत, दुसऱ्या नेत्यासोबत बंद गाडीत प्रवास करणे हे अंतिम विश्वासाचे लक्षण आहे.
फॉर्च्युनर एसयूव्हीचा ताफा विमानतळावरून निघताच, हे स्पष्ट झालं की ही भेट केवळ करारांवर स्वाक्षरी करण्यापुरती मर्यादित नव्हती. पुतिन यांचा पंतप्रधान मोदींच्या कारमधील प्रवास किंवा मोदींचा पुतिन यांच्यासोबतचा प्रवास, "अतिथी देवो भव" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय आदरातिथ्याचे प्रतिबिंबित करतो. दोन्ही नेते खिडकीतून बाहेर पाहत असताना, ते जगाला दाखवून देत होते की भारत आणि रशिया एक समान मार्ग सामायिक करतात.
