या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. वडिलांनी टोकल्याचा राग इतका भयंकर होता की तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो मुलगा आणि वडिलांचं नातंच विसरला. त्याने मित्रांसोबत मिळून वडिलांच्या हत्येचा कट आणखला ठरल्याप्रमाणे तो यशस्वी केला. वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्याच्या मनाला जराही काही वाटलं नसावं का असा प्रश्न ही घटना समजलेल्या प्रत्येकाच्या मनात आहे. वाईट संगतीचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे.
advertisement
नेमकं काय प्रकरण
वडिलांनी केवळ वाईट संगत सोडण्यावरून टोकलं म्हणून, एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांसोबत मिळून वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली.वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून मुलगा पसार झाला. एकुलत्या एका मुलाला हटकणं महागात पडलं. तस्वीर सिंह यांचा मुलगा ११वीमध्ये शिकत होता. पण, त्याची संगत योग्य नसल्यामुळे त्याला सतत टोकत होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये घरात अनेकदा वाद होत असत. वडिलांच्या या रागामुळे संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलाने आपल्या दोन अल्पवयीन मित्रांसोबत मिळून वडिलांच्या हत्येचा प्लॅन आखला, अशी माहिती एएसपी विनीत भटनागर यांनी दिली.
कुठे घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हापुड परिसरात घडली. मुलाने वडिलांना मारण्यासाठी जी पद्धत वापरली, ती पाहून तर पोलिसांनाही धक्का बसला. मुलाने आपल्या मित्रांना वडिलांना फोन करायला सांगितला. वडिलांना फोनवर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्याला सतत बोलता, त्यामुळे तो आता शेतात जाऊन आत्महत्या करत आहे. तुम्ही लवकर या असं सांगितलं.
मुलाच्या आत्महत्येची बातमी ऐकताच, तस्वीर सिंह तात्काळ मुलाला वाचवण्यासाठी शेतात पोहोचले. वडिलांचं मन मुलाला गमवू नये या भीतीनं घाबरलं होतं, पण तिथे आधीच मृत्यूचा सापळा रचलेला होता. तस्वीर सिंह शेतात पोहोचताच, एका साथीदाराने त्यांना बोलण्यात गुंतवले आणि दुसऱ्या साथीदाराने पिस्तुलाने गोळी झाडून त्यांची थंड डोक्याने हत्या केली. सुरुवातीला त्यांच्या भावाने अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी सखोल तपास केल्यावर या धक्कादायक घटनेचा खुलासा झाला असून, पोलिसांनी मुलाच्या दोन अल्पवयीन मित्रांना अटक केली आहे.
