सोनम रघुवंशीच्या प्रेग्नन्सी टेस्टमध्ये काय समोर आलं?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोनमची गर्भधारणा चाचणी देखील करण्यात आली होती. ज्याचा अहवाल स्पष्टपणे येऊ शकला नाही. डॉक्टरांच्या पॅनेलने सोनमच्या प्रेग्नन्सीबाबत रिपोर्टमध्ये "अनिर्णित" असा उल्लेख केला आहे. तसेच आणखी एका आठवड्यानंतर पुन्हा सोनमचा अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की सुरुवातीच्या टप्प्यात प्रेग्नन्सी चाचणीचे अचूक निकाल मिळणे कठीण असतं. त्यामुळे सोनम प्रेग्नंट आहे की नाही? हे कळण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहणं आवश्यक आहे.
advertisement
सोनमला घेऊन पोलीस मेघालयला रवाना
गर्भधारणा चाचणीच्या अस्पष्ट अहवालामुळे या प्रकरणात एक नवीन आणि संवेदनशील वळण आले आहे. ज्यामुळे तपास यंत्रणांची दक्षता आणखी वाढली आहे. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सोनमला मेघालय पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे. तिची पुढची चौकशी मेघालयात केली जाईल. जिथे पोलीस तिला गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन जातील आणि हत्याकांडातील सर्व बारकावे तपासले जातील. मेघालयातील शिलाँग येथे हनिमूनसाठी गेलेल्या सोनम रघुवंशीवर आता तिचा पती राजा रघुवंशी यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
सोनमला 72तासांची पोलीस कोठडी
पतीची हत्या केल्यानंतर सोनम मागील १७ दिवसांपासून बेपत्ता होती. रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री सोनम उत्तर प्रदेशातील गाझीपूरला पोहोचली. त्यानंतर तिला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. सोमवारी सोनमला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने सोनमला ७२ तासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या मेघालय पोलिसांचे पथक कडक सुरक्षा व्यवस्थेत सोनमला घेऊन शिलाँगला रवाना झालं आहे.