सोनमचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण
मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग म्हणाले की, राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनमने यूपीतील गाजीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. रात्री उशिरा झालेल्या छाप्यात इतर तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली. यूपीमधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, तर इतर दोन आरोपींना एसआयटीने इंदूरमधून पकडले आहे, असंही आय नोंगरांग डीजीपी म्हणाले आहेत.
advertisement
मेघालयचे मुख्यमंत्री म्हणतात...
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या हनिमून हत्याकांडाची उकल केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक केलं आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलं आहे की, 'राजा हत्याकांडात मेघालय पोलिसांना 7 दिवसांत मोठे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील 3 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, महिलेने आत्मसमर्पण केले आहे आणि आणखी एका हल्लेखोराला पकडण्याची कारवाई अजूनही सुरू आहे.'
सोनमच्या आईची प्रतिक्रिया
दरम्यान, सोनम सापडली याबद्दल आम्ही आभारी आहोत, पण वेदना अजूनही कायम आहेत. आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे की राजाच्या हत्येमागे कोण होतं? ती परत आली आहे, पण तरीही दुःख आहे, आम्ही राजाला गमावलं, असं सोनम रघुवंशीची आई संगीता यांनी म्हटलं आहे.