भागलपूर : रेल्वेचा एक डबा पुलावर आदळला आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. रेल्वेच्या रिकाम्या डब्याची ट्रकमधून वाहतूक सुरू होती. अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि रेल्वेचा डबा खाली कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बिहारच्या भागलपूरमध्ये ही घटना घडली. त्यावेळी सकाळची वेळ होती. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होती. अन्यथा रेल्वेचा डबा रस्त्यावर पडताच मोठी जीवितहानी झाली असती. दरम्यान, या अपघातानंतर त्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
advertisement
यूट्यूबवरून मिळाली आयडिया, मग काय...आज दिवसाला होतेय 4 ते 5 हजारांची कमाई!
यापूर्वीही झाला होता अपघात
भागलपूरमध्ये यापूर्वीदेखील मोठा रेल्वे अपघात घडला होता. उलटा पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोहिया पूलाचा एक मोठा भाग रेल्वेवर आदळला होता. त्यात अनेकजणांनी आपला जीव गमावला.
तुम्ही 'या' चुका नाही ना करत? नाहीतर खातं होऊ शकतं खाली!
तर आता रेल्वेचा एक पूर्ण डबाच पुलावर आदळला. या डब्यात रेल्वे रेस्टॉरंट तयार करण्यात येणार होतं. आतादेखील डब्याची देखभाल-दुरुस्ती करून रेस्टॉरंट सुरू करण्याची योजना आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g