पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्याच आल्याची माहिती आहे. तिघांची हत्या करत सात नागरिकांना मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. ठार केलेल्या नागरिकांना पोलिसांचा खबऱ्या ठरवून ठार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न माओवाद्यांनी केल्याचं मानलं जातंय. हत्या आणि मारहाणीच्या घटनेनंतर दहा ते बारा नागरिकांना माओवाद्यांनी अपहरण करून सोबत नेल्याची माहिती पुढे येत आहे.
advertisement
नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन
छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये 5 जूनपासून चकमक सुरु आहे. तीन दिवसांत सात माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. या चळवळीतील टॉप कमांडक भास्करचा खात्मा करण्यात आला होता. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध सतत मोहीम राबविली जात आहे. मार्च 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकार नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन सतत करत आहे.