TRENDING:

Train : बायकोसोबत आरामात करायचा होता प्रवास, ट्रेनमध्ये सीट न मिळाल्याने नवऱ्याचा ‘अजब प्रकार’, थेट पोहोचला तुरुंगात

Last Updated:

ट्रेनची सीट मिळण्यालाठी लोकांना भन्नाट उपाय शोधताना तुम्ही पाहिलं असेल, पण एका व्यक्तीने असा काही प्रकार केला आहे की तो थेट तरुंगात पोहोचला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. ट्रेनने सुखाचा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी महिना-दोन महिना अगोदर तिकिट काढावी लागते आणि एकदा का कन्फर्म तिकिट मिळाली की मात्र ट्रेनने प्रवास करण्याची मजा काही औरच आहे. पण जेव्हा ट्रेनमध्ये रिजर्वेशन मिळत नाही, तेव्हा प्रवास अगदी नकोस वाटतं. कारण यामुळे ट्रेनमध्ये खाली बसून किंवा टॉयलेट सीटजवळ बसून लोकांना प्रवास करावा लागतो, जो कधीकधी नकोसाच वाटतो.
AI generated Photo
AI generated Photo
advertisement

ट्रेनची सीट मिळण्यालाठी लोकांना भन्नाट उपाय शोधताना तुम्ही पाहिलं असेल, पण एका व्यक्तीने असा काही प्रकार केला आहे की तो थेट तरुंगात पोहोचला. त्याने केलेला प्रकार ऐकून तुम्ही देखील डोक्यावर हात माराल आणि असं कोण करतं? असा प्रश्न तुमच्या मनात उभा राहिल.

हा प्रकार नुकताच विक्रमशिला एक्सप्रेसमध्ये घडला, ज्यात एका प्रवाशाच्या “सीट मिळवण्याच्या हट्टामुळे” संपूर्ण रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली.

advertisement

बिहारहून दिल्लीकडे जाणाऱ्या विक्रमशिला एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची आणि ट्रेनमध्ये काही दहशतवादी प्रवास करत असल्याची माहिती मिळताच, अलीगड जंक्शनवर ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. बॉम्ब स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉडच्या टीमनी ट्रेनचा प्रत्येक डबा, प्रत्येक सीट तपासला. प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ आणि भीतीचं वातावरण पसरलं. मात्र तपासणीदरम्यान काहीही संशयास्पद आढळलं नाही. शेवटी ट्रेनला सुरक्षितपणे पुढे सोडण्यात आलं.

advertisement

कॉल कोणी केला?

या खोट्या अलर्टनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कॉल करणाऱ्याचं लोकेशन ट्रेस केलं असता, तो पश्चिम दिल्लीचा रहिवासी मोनू सक्सेना असल्याचं स्पष्ट झालं. मोनूने रेल्वे हेल्पलाइन 139 आणि यूपी पोलिसांच्या 112 नंबरवर कॉल करून सांगितलं होतं की विक्रमशिला एक्सप्रेसमध्ये बॉम्ब आहे आणि 4–5 दहशतवादी आहेत. या कॉलनंतर रेल्वे आणि जीआरपी दोन्हीकडे मोठी हालचाल झाली, पण काही वेळातच समजलं की ही माहिती पूर्णपणे खोटी आहे.

advertisement

सीट न मिळाल्याने आखला विचित्र प्लान

मोनू आणि त्याची पत्नी भागलपूरहून दिल्लीला परतत होते. पण ट्रेनमध्ये दोघांनाही सीट मिळाली नाही. ते स्लीपर कोचमधील टॉयलेटजवळ बसले होते. याच वेळी मोनूच्या डोक्यात एक विचित्र कल्पना आली जर ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची बातमी दिली, तर प्रवासी घाबरून उतरतील आणि आपल्याला सीट मिळेल. या विचाराने प्रेरित होऊन त्याने खोटा बॉम्ब कॉल केला.

advertisement

पोलिसांच्या तपासात समोर आलं की, ट्रेन इटावा जिल्ह्यातील जसवंतनगर स्टेशनवर सिग्नल न मिळाल्याने थांबली असताना मोनू खाली उतरला आणि दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन केला. पण नशिबाचा खेळ असा झाला की कॉल केल्यानंतर लगेच ट्रेन सुटली आणि मोनू स्वतःच मागे राहिला. नंतर पोलिसांनी त्याला भरथना–इटावा परिसरातून अटक केली.

अलीगड जंक्शन जीआरपीचे SHO संदीप तोमर यांनी सांगितलं की, मोनू सक्सेनाला अटक करून न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. चौकशीत त्याने सांगितलं की, त्याने हा कॉल मस्करी म्हणून आणि सीट मिळवण्यासाठी केला होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

तो मजुरी करणारा आहे आणि त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. मात्र, त्याच्या या ‘मजेशीर’ कृतीमुळे संपूर्ण रेल्वे व्यवस्था काही काळ तणावात आली आणि शेवटी त्याचं स्वप्नातलं आरामदायी प्रवासाचं स्वप्न थेट तुरुंगातल्या सीटवर संपलं.

मराठी बातम्या/देश/
Train : बायकोसोबत आरामात करायचा होता प्रवास, ट्रेनमध्ये सीट न मिळाल्याने नवऱ्याचा ‘अजब प्रकार’, थेट पोहोचला तुरुंगात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल