TRENDING:

लग्न सोहळा ठरला मृत्यूचा फास! चार मुलांसह 9 जणांनी गमावला जीव, कुटुंबासोबत घडलं भयंकर

Last Updated:

गाडीचा अक्षरश: चुराडा झाला होता. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. रक्ताचा सडा आणि मृतदेह रस्त्यावर पडले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लग्न सोहळ्याला जाणं कुटुंबासाठी मृत्यूचा फास ठरला आणि भयंकर घटना घडली. यातून वाचणं शक्यच नव्हतं, दोन जण वाचले आणि त्यांनी जे सांगितलं ते अंगावर काटा आणणारं होतं. लग्न सोहळा करुन घरी परत जात असताना पहाटे तीनच्या सुमारास मृत्यूनं गाठलं. काही कळण्याच्या आत किंकाळ्या आणि जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. गाडीचा अक्षरश: चुराडा झाला होता. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. रक्ताचा सडा आणि मृतदेह रस्त्यावर पडले होते.
News18
News18
advertisement

ओमनी गाडीवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला. गाडीचा अक्षरश: चुराडा झाला. हा संपूर्ण प्रकार पाहून घाबरलेला ट्रक चालक फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात दाखल केलं आणि मृतदेह ताब्यात घेतले. या भीषण अपघातात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. थांदला-मेघनगर भागातील संजोली रेल्वे फाटकाजवळ झालेल्या या भीषण अपघातात दोन कुटुंबांतील 9 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 लहान मुलं, 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात 1 महिला आणि 1 लहान मुलगी गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

advertisement

एका भरधाव ट्रक आणि व्हॅन यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, ट्रक अनियंत्रित होऊन इको व्हॅनवरच उलटला. त्यामुळे व्हॅनमध्ये असलेले लोक आत अडकले. मृतांपैकी 8 जण थांदला येथील शिवगड महुदा गावाचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण कल्याणपुरा जवळील भावपुरा गावातून एका विवाह सोहळ्याहून परत येत असताना हा अपघात झाला.

advertisement

अपघातानंतर आजूबाजूचे लोक आणि वाटसरू किंकाळ्या ऐकून तात्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि गाडीच्या काचा फोडून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी जखमींना तात्काळ सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) शाहाबाद येथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान 5 जणांचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या/देश/
लग्न सोहळा ठरला मृत्यूचा फास! चार मुलांसह 9 जणांनी गमावला जीव, कुटुंबासोबत घडलं भयंकर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल