दरम्यान, सोशल मीडियावर भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत विविध दावे केले जातायत. भारत समोरासमोर पाकिस्तानशी दोन हात करत असला तरी इतर दोन देशांची पाकिस्तानला मदत होती, असा दावा सोशल मीडियावर केला जातोय. जेव्हा भारत पाकिस्तान संघर्षाला तोंड फुटलं, तेव्हा तुर्किस्तानचं एक अज्ञात कार्गो विमान पाकिस्तानमध्ये उतरलं होतं. या विमानातून तुर्किने पाकिस्तानला ड्रोनचा पुरवठा केल्याचं समोर आलं होतं. अशाच प्रकारे चीनने देखील पाकिस्तानला मदत केली. चीननेही पाकिस्तानला पाठिंबा दिला असून चीनचे Y-20 हे स्ट्रॅटेजिक ट्रान्सपोर्ट विमानही पाकिस्तानला गेले असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर चीनने त्यावर खुलासा केला.
advertisement
सोशल मीडियावर पसरत असलेल्या बातम्या खोट्या असल्याचं चीनने सांगितलं. चीनने भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कोणतीही लष्करी मदत केली नाही, असा खुलासा चीनने केला. खरं तर, जेव्हा दोन्ही देशात संघर्ष सुरू झाला. तेव्हा चीनने पाकिस्तानला समर्थन दर्शवलं. असं असलं तरी आपण लष्करी मदत केली नाही, असं स्पष्टीकरण चीनने दिलं. पाकिस्तानने आपल्याकडे मदत मागितली होती, मात्र आम्ही लष्करी मदत केली नाही, असंही चीनने म्हटलं.
चीनच्या 'चायना ग्लोबल टाइम्स'च्या वृत्तात नक्की काय म्हटलं?
अलिकडेच, चीनच्या Y-20 स्ट्रॅटेजिक ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने पाकिस्तानला लष्करी मदत पोहोचवली, असा दावा करणारी ऑनलाइन माहिती मोठ्या प्रमाणात पसरली आहे. रविवारी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) एअर फोर्सने एक निवेदन काढून संबंधित माहिती खोटी असल्याचं सांगितलं. तसेच सोशल मीडियावर चीनने पाकिस्तानला लष्करी मदत केली, या दाव्याचं खंडन केले.