ठराविक वयाच्या कमी असल्यावर कुठेही लग्न करणं अपराधच मानलं जातं. मात्र एका महिलेनं आणि मुलानं लग्न केलं. तेही भरपूर लोकांच्या उपस्थितीत त्यांनी हे लग्न पार पाडलं. मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे लग्न करणारा वर मात्र खूप लहान आहे.
ज्याने पाडला रक्ताचा सडा, त्याच्याच प्रेमात वेडी झाली महिला; शेवट झाला थरकाप उडवणारा
advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेजवर एक महिला लाल रंगाच्या नवरीच्या कपड्यांमध्ये आहे आणि तिच्यासमोर खूप लहान मुलगा उभा आहे. तो नवरदेवाच्या कपड्यांमध्ये हार घेऊन आहे. दोघेही एकमेकांना हार घालतात. बालविवाह सुरु असल्याचं पहायला मिळत आहे.
@divya_gandotra नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 40 सेकंदांचा हा लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच धुमाकूळ पहायला मिळाला. लोकांनी या बालविवाहाला विरोध करत संतापही व्यक्त केला. व्हिडीओ शेअर करत युजरनं राजस्थान पोलीसला टॅग केलं आहे. त्यांनी पोलिसांना याविषयी कारवाई करण्यास सांगितलं आहे.