भारताने केलेलं ऑपरेशन सिंदूर हे फक्त हवाई हल्ल्याचं नाव नाही, तर तो एक संदेश होता, भारत आता थांबणार नाही. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या एअर स्ट्राइकच्या माध्यमातून भारताने काय साध्य केलं? हे थोडक्यात समजून घेऊया.
1 दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय असलेले लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे 9 महत्त्वाचे लाँचपॅड्स अचूकपणे उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांचे हे तळ फक्त प्रशिक्षणासाठीच नव्हते, तर या तळांवरून भारताच्या हल्ल्याचं नियोजन केलं जात होतं.
advertisement
2 पाकिस्तानच्या मुख्य भागात थेट स्ट्राइक
भारताने केलेला हल्ला हा फक्त पाकव्याप्त काश्मीरपुरताच मर्यादित नव्हता. भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानचा मुख्य प्रदेश असलेल्या पंजाब प्रांतातही धडक दिली, ज्याला पाकिस्तान लष्कराचं 'सेफ झोन' मानलं जातं. बहावलपूरसारख्या संवेदनशील ठिकाणी कारवाई झाली, ही तीच जागा आहे जिथे अमेरिकाही ड्रोन पाठवायला टाळाटाळ करत होती.
3 पाकिस्तानचं हवाई संरक्षण फसवून कारवाई
केवळ स्ट्राइकच नाही, तर त्याआधी भारताने पाकच्या हवाई संरक्षण व्यवस्थेला फसवलं किंवा थेट 'जॅम' केलं.
23 मिनिटांत ऑपरेशन पार पडलं आणि पाकिस्तानला कळेपर्यंत सगळं संपलं होतं. राफेल विमानं, SCALP मिसाईल्स आणि HAMMER बॉम्ब्सच्या मदतीनं ही कारवाई झाली आणि भारताचं तांत्रिक आणि सामरिक वर्चस्व पुन्हा सिद्ध झालं.
4 अनावश्यक विनाश न करता अचूक लक्ष्य
भारताने एअर स्ट्राइकच्या माध्यमातून अचूक लक्ष्य साधलं, पण हे लक्ष्य साधताना भारताने अनावश्यक विनाश केला नाही. भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर, नागरी वस्त्यांवर हल्ले केले नाहीत. भारताने फक्त आणि फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, यातून भारताचे 'झिरो टॉलरन्स, नो एक्सप्लॉयटेशन' हे धोरण दिसून आलं.
5 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून वॉन्टेड लिस्टमधील अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. काही दहशतवादी तर हल्ला झाला हे कळायच्या आधीच नष्ट झाले. भारताने एका रात्रीमध्येच अनेक दहशतवादी नेटवर्कचे नेते साफ करून टाकले.
6 तीनही सैन्यदलांचा समन्वय
भारताने केलेलं हे ऑपरेशन केवळ हवाई कारवाईचं ऑपरेशन नव्हतं. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिघांनी मिळून अत्यंत अचूकपणे आणि वेळेच्या मर्यादेत संयुक्त कारवाई केली. हा जॉइंट वॉरफेअरचा नवा टप्पा मानला जात आहे.
7. जगाला दिलेला संदेश
भारत आता कोणाची परवानगी घेणार नाही. आपल्या लोकांचं रक्षण करणं ही भारताची जबाबदारी आहे आणि जो कुणी दहशत माजवेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, कुठेही, केव्हाही, हा संदेश भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिला. हा संदेश पाकिस्तानपुरता नव्हे, तर जगभरात गेला. 'दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांनाही आता कुठेही लपायला जागा उरणार नाही', भारतानं हे सिद्ध करून दाखवलं.
शेवटी एवढंच, ऑपरेशन सिंदूर म्हणजे केवळ बदल्याचा हल्ला नव्हे, तर भारताच्या नव्या धोरणाचा स्पष्ट संकेत आहे :
"We will strike. We will not wait. We will not warn."