TRENDING:

Atishi : पहिल्यांदा आमदार, मंत्री झाल्यानंतर वर्षभरातच होणार मुख्यमंत्री; कोण आहेत आतिशी?

Last Updated:

आतिशी मार्लेना या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील त्या सर्वात वजनदार अशा मंत्री होत्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आपकडून आतिशी मार्लेना यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. आप आमदारांच्या बैठकीत आतिशी मार्लेना यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आतिशी मार्लेना या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील त्या सर्वात वजनदार अशा मंत्री होत्या. त्यांच नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होतं. आमदारांच्या बैठकीत आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. मंगळवारी सकाळी आपचे संयोजक केजरीवाल यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. यात सर्वानुमते गटनेतेपदी आतिशी यांची निवड करण्यात आली. आतिशी पंजाबी राजपूत परिवारातील असून त्यांनी ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतून पदवीचं शिक्षण घेतलंय.
News18
News18
advertisement

२०२० च्या निवडणुकीत त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. तर २०२३ मध्ये केजरीवाल यांनी त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली. आता वर्षभरातच त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. याआधी २०१९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढली होती. तेव्हा आतिशी यांचा भाजप उमेदवार गौतम गंभीरने पराभव केला होता.

आतिशी यांना केजरीवाल यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. त्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून संघटनेत सक्रीय आहेत. यावेळी त्यांच्याकडे सर्वाधिक मंत्रालयांची जबाबदारी होती. मार्च महिन्यात केजरीवाल जेव्हा तुरुंगात गेले तेव्हापासून सरकारमध्ये त्यांनी सर्व जबाबदारी सांभाळली होती.

advertisement

१९८१ मध्ये दिल्लीत जन्मलेला आतिशी यांचे वडील दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते. आतिशी यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील शाळेत झालं. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादन केली. ऑक्सफर्डमधून परतल्यानंतर मध्य प्रदेशातील एका लहान गावात त्यांनी सात वर्षे काम केलं. तिथं एनजीओसोबत काम करताना त्यांची ओळख आपच्या काही सदस्यांसोबत झाली आणि पक्षाच्या स्थापनेत त्या सहभागी झाल्या.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Atishi : पहिल्यांदा आमदार, मंत्री झाल्यानंतर वर्षभरातच होणार मुख्यमंत्री; कोण आहेत आतिशी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल