लोकसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भापकडून प्रयत्न सुरू आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला आणि डी पुरांदेश्र्वरी यांची नावं चर्चेत आहेत. तर दुसरीकडे लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला मिळावं अशी मागणी इंडिया आघाडीकडून करण्यात आली आहे. जर उपाध्यक्षपद मिळालं नाही तर इंडिया आघाडी अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्याची शक्यता आहे. लोकसभेचे नवे अध्यक्ष कोण असणार हे आज दुपारी बारापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान भाजपकडे सत्तास्थापनेसाठी स्वबळावर बहुमत नसल्यानं चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाच्या उमेदवाराचं नाव देखील चर्चेत होतं. जर टीडीपीचा उमेदवार दिला तर आम्ही पाठिंबा देण्यासाठी विचार करू असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र आता भाजपकडून पुन्हा एकदा ओम बिर्ला यांचं नाव लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.