TRENDING:

रीलमध्ये नाचण्यापासून रोखायचा पती, पत्नी युट्युबवर शिकली 'मर्डर टुटोरियल', रात्री काढला काटा!

Last Updated:

रीलमध्ये नाचण्याचा आणि इन्स्टाग्रामपासून दूर राहण्याचा आग्रह धरल्यामुळे पत्नीने पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रीलमध्ये नाचण्याचा आणि इन्स्टाग्रामपासून दूर राहण्याचा आग्रह धरल्यामुळे पत्नीने पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुख्य म्हणजे पत्नीने युट्यूबवर मारण्याची पद्धत पाहिली आणि पतीचा काटा काढला आहे.
रीलमध्ये नाचण्यापासून रोखायचा पती, पत्नी युट्युबवर शिकली 'मर्डर टुटोरियल', रात्री काढला काटा!
रीलमध्ये नाचण्यापासून रोखायचा पती, पत्नी युट्युबवर शिकली 'मर्डर टुटोरियल', रात्री काढला काटा!
advertisement

28 जानेवारी रोजी पोलिसांना 25 वर्षीय कैलाशचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, पंचनामा केला, गुन्हा दाखल केला, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात मृत्यू गळा दाबून झाल्याचे उघड झाले. त्यानंतर, पोलिसांनी सापळा रचला आणि 24 तासात गूढ उकलले.

तपासात असे दिसून आले की घटनेच्या रात्री पती-पत्नी लग्नाला गेले होते. पत्नी डीजेच्या तालावर नाचत रील बनवत होती. पती कैलाशने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला नाचण्यास आणि सोशल मीडियावर रील अपलोड करण्यास मनाई केली. या एका गोष्टीने तिला राग आला आणि तिने तिच्या पतीला मारण्याचा निर्णय घेतला.

advertisement

युट्यूबवर 'मर्डर ट्यूटोरियल' पाहिले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा दर तेजीत, आले आणि डाळिंबाला कसा मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

पत्नी युट्यूबवरून तिच्या पतीला कसे मारायचे हे शिकली. कैलास घरी परत येताच आणि झोपी जाताच, अल्पवयीन पत्नीने संधी साधली, घरात असलेल्या पगडीला दोरी बनवली आणि तिचा पती मरेपर्यंत गळा दाबून मारलं. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. मध्य प्रदेशच्या झाबुआमध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
रीलमध्ये नाचण्यापासून रोखायचा पती, पत्नी युट्युबवर शिकली 'मर्डर टुटोरियल', रात्री काढला काटा!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल