TRENDING:

9 ऐवजी 10 तास काम पगारही नाही वाढणार, नोकरीसाठी या राज्यात नियम बदलला

Last Updated:

RBI ने रेपो रेट कमी केला, पण आंध्र प्रदेश सरकारने कामाचे तास 9 ऐवजी 10 करण्याचा निर्णय घेतला. महिलांना नाईट शिफ्ट करावी लागणार आहे. कामगार संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
RBI ने नुकताच रेपो रेट कमी करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेऊन दिलासा दिला. कर्जावरील व्याजदरात कपात होणार आहे. त्याचा आनंद साजरा करणार तोच हा आनंद फार काळ टिकला नाही, याचं कारण म्हणजे कामाच्या तासांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 9 ऐवजी 10 तास काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम लागू करणारे हे राज्य पहिलं ठरलं आहे. खासगी कर्मचाऱ्यांना 9 ऐवजी 10 तासांची शिफ्ट असेल. शिवाय महिलांना आता नाईट शिफ्ट देखील करावी लागणार आहे.
News18
News18
advertisement

आंध्र प्रदेश सरकारने खाजगी कंपन्या आणि कारखान्यांतील कामगारांसाठी दररोजच्या कामाच्या तासांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत कामाचे 9 तास होते, मात्र ते वाढवण्यात आले असून 10 तास करण्यात आले आहे. कामाचे 10 तास करण्यास तेलुगू देसम पार्टीच्या चंद्राबाबू नायडू सरकारने मंजुरी दिली. सरकारचा दावा आहे की हे पाऊल Ease of Doing Business या धोरणाअंतर्गत अधिक गुंतवणूक आणि उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उचलले आहे.

advertisement

कामगार संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात कामबंद आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. कामगार संघटनांच्या मते, कामगारांना गुलाम बनवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. याआधी राज्यात कामाचे तास आठ होते, ते वाढवून 9 करण्यात आले होते. वाढलेल्या तासांच्या बदल्यात पगारवाढ मिळत नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

advertisement

नव्या नियमांनुसार ओव्हरटाईम मर्यादा 75 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच, कामगारांना अतिरिक्त वेतन केवळ 144 ओव्हरटाईम तासांनंतरच मिळेल. याशिवाय, महिला कर्मचाऱ्यांना नाईट शिफ्टमध्ये काम करण्याची मुभा देण्यात आली असून, त्याऐवजी सुट्टी मिळेल की नाही हे व्यवस्थापनाच्या निर्णयावर अवलंबून असेल.सीपीएमचे राज्य सचिव व्ही. श्रीनिवास राव यांनी हा निर्णय केंद्राच्या दबावाखाली घेतल्याचा आरोप करत, “हे बदल केवळ उद्योजकांना खुश करण्यासाठी आहेत आणि कामगारांचे शोषण करणारे आहेत,” असे सांगितले. कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
9 ऐवजी 10 तास काम पगारही नाही वाढणार, नोकरीसाठी या राज्यात नियम बदलला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल