नेमकं काय घडलं?
श्रद्धा शर्मा ‘ताज महाल हॉटेल’मधील प्रसिद्ध House of Ming या फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये दिवाळीच्या जेवणासाठी आपल्या बहिणीसह गेल्या होत्या. त्यांनी कोल्हापुरी चप्पल आणि सलवार-कमीज परिधान केले होते. रेस्टॉरंटमध्ये त्या आपल्या खुर्चीवर मांडी घालून बसल्या. त्यावेळी रेस्टॉरंटच्या एका मॅनेजरने त्यांना “पाय खाली ठेवा आणि व्यवस्थित बसा, इथे श्रीमंत लोक येतात” अशी टिप्पणी केल्याचा त्यांचा आरोप आहे. याचबरोबर स्टाफने त्यांना क्लोज्ड शूज घालण्याचा सल्ला दिला. त्यामुळे या प्रकरणात अधिकच वाद निर्माण झाला.
advertisement
श्रद्धा शर्मा यांनी काय म्हटले?
या घटनेविषयी श्रद्धा यांनी व्हिडिओद्वारे भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, “मी कोल्हापुरी चप्पल माझ्या कष्टाच्या पैशांनी घेतली आहे. मी सभ्य पोशाखात इथे आली, तरीही मला पाय खाली ठेवा किंवा बसण्याच्या स्टाईलवर आक्षेप घेतला गेला. एक सामान्य नागरिक आपल्या मेहनतीच्या पैशाने हॉटेलमध्ये गेल्यावरही त्याचा अपमान केला जातो, हे दु:खद आहे. माझी चूक एवढीच की मी खुर्चीवर पद्मासन पद्धतीत बसले होते. जर एखाद्याला माझ्या चप्पला, बसण्याची पद्धत किंवा जीवनशैली त्रासदायक असेल, तर आपल्याकडे अजूनही वर्ग, श्रीमंती आणि संस्कृती यांचे भिंती आहेत, हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले.
सोशल मीडियावर संतापाची लाट
या प्रकरणावर नेटिझन्सनी लक्झरी हॉटेलमधील ‘शिष्टाचार’ आणि ‘क्लास डिव्हाईड’वर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकांनी श्रद्धा शर्मा यांना पाठिंबा दिला.
