गुजरातसाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला आहे. अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचं AI-171 विमान लंडनला जाण्यासाठी निघालं होतं. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांमध्ये क्रॅश झालं. या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाची यादी समोर आली आहे. प्रवाशांच्या यादीत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी प्रवास करत होते. विजय रुपानी यांची पत्नी ही लंडनला वास्तव्यास आहे. त्यांना भेटण्यासाठी रुपानी हे लंडनला अहमदाबाद विमानतळावरून निघाले होते.
advertisement
विजय रुपाणी हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी 7 ऑगस्ट 2016 ते 11 सप्टेंबर 2021 या काळात गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पाहिला होता.
विजय रुपानी यांची राजकीय कारकीर्द
त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) कार्यकर्ते म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित आहेत.
आणीबाणीच्या काळात (1975-77) त्यांनी विरोध केला होता आणि त्यांना 11 महिने तुरुंगातही राहावे लागले होते.
1987 मध्ये ते राजकोट महानगरपालिकेवर निवडून आले.
1996 ते 1997 या काळात त्यांनी राजकोटचे महापौर म्हणून काम केले.
ते 2006 ते 2012 पर्यंत राज्यसभा सदस्य होते.
2014 मध्ये ते राजकोट पश्चिम मतदारसंघातून गुजरात विधानसभेवर निवडून आले.
आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात ते वाहतूक, जलपुरवठा, कामगार आणि रोजगार मंत्री होते.
फेब्रुवारी 2016 ते ऑगस्ट 2016 पर्यंत ते भाजपच्या गुजरात प्रदेशाचे अध्यक्ष होते.
7 ऑगस्ट 2016 रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले आणि 11 सप्टेंबर 2021 पर्यंत या पदावर होते.