अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचं AI171 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघालं होतं. टेक ऑफ केल्यानंतर दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी हे विमान रहिवासी भागात कोसळलं. विमानतळाच्या धावपट्टीपासून काही अंतरावर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे. या हॉस्टेलच्या मेसवर हे विमान कोसळलं. एअर इंडियाचं या विमानामध्ये २४२ प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. टेकऑफ केल्यानंतर विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि विमान अवघ्या १० मिनिटांमध्ये कोसळलं. विमान कोसळल्यानंतर आगीचा आगडोंब उसळला होता. घटनास्थळावर मृतांचा खच्च पडला होता. विमान दुर्घटनेत आतापर्यंत 210 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
मेडिकल कॉलेजच्या कँटीनवर कोसळलं विमान
विमानाने टेकऑफ केल्यानंतर अवघ्या १० मिनिटामध्ये कोसळला. अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या काही अंतरावर मेघानी नगर आहे. त्या ठिकाणी एक बिजे हॉस्पिटलची मेस आहे. या मेसच्या इमारतीत हे विमान घुसलं. विमान कोसळल्यानंतर भीषण असा स्फोट झाला. या स्फोटात मेसमधील २५ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
काय होता पायलटचा शेवटचा मेसेज?
दरम्यान, एअर इंडियांचे हे विमान अहमदाबाद ते लंडन पर्यंत प्रवास करणार होते. दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केल्यानंतर मेघानी नगर परिसरात कोसळले. ज्यावेळी विमानाने रनवे वरून उड्डाण केल्यानंतर पायलटने 1o मिनिटातच हे विमानाच्या पायलटने एटीसी एक संदेश पाठवला होता. ज्यामध्ये त्याने Mayday Mayday असा संदेश पाठवला होता. याचा अर्थ आम्ही क्रॅश करत आहोत आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. विमान सुरक्षीत लँड करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले असे पायलटने एटीसीला सांगितले. त्यानंकर काही क्षणातच पायलटचा संपर्क तुटला होता.