सुरुवातीला असं वाटत होतं की इंग्लंडची टीम या दबावाखाली लवकरच ऑल आऊट होईल, परंतु इंग्लिश फलंदाजांनी मैदानात जिद्दीने लढा दिला. मॅच शेवटच्या सत्रापर्यंत रंगतदार अवस्थेत पोहोचली होती आणि एक वेळ अशी आली होती की इंग्लंड हे लक्ष गाठून चमत्कार करेल असे वाटू लागले. मात्र, विल जॅक्स चांगल्या फॉर्मात खेळत असतानाच बाद झाला आणि तिथूनच मॅचचे चित्र पूर्णपणे बदललं.
advertisement
जॅक्स बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी जोरदार पुनरागमन केले आणि इंग्लंडचा डाव विखुरला. अखेर ऑस्ट्रेलियाने 82 रन्सने विजय मिळवत या ऍडलेड टेस्टसह मानाच्या ॲशेस सीरीजवर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 371 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 286 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 349 धावा करून इंग्लंडसमोर 435 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा डाव 352 धावांवर आटोपला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीने पहिल्या डावात 106 धावांची खेळी केली. तर बेन्स स्टोक्सने पहिल्या डावात 83 डावांची झुंजार खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात ट्रेव्हिस हेड इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरला. तर दुसऱ्या डावात देखील अॅलेक्स कॅरीने अर्धशतक झळकावलं.
