विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना महायुतीच्या पत्रकार परिषदेत उत्तर देण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांकडून सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये सकारात्मक असं वातावरण आहे. पैसे येणार नाही असा आरोप विरोधकांनी केला. काहीही आरोप करण्यात आले. आरोप करण्याचा अधिकार आहे पण त्याला तारतम्य ठेवण्याची गरज आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं.
advertisement
फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला. निवडणुका दोन, तीन टप्प्यात घेतल्या जातील अशा चर्चा विरोधकांनी सुरू केल्या. पण निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेतं आणि ते स्वायत्त आहेत. त्यांचे निर्णय ते घेतात असंही अजित पवार यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक घाबरले नाहीत तर ते गडबडले आहेत असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलीय. २४४ ते २४५ जागांचं वाटप झालं आहे. फक्त ४३ ते ४४ जागांचा तिढा असून तो एकाच बैठकीत सोडवला जाणार असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सांगितलंय.
