मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी, महायुती यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत बोरिवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टींच्या नावाची चर्चा झाली. गोपाळ शेट्टी हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. जर गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली गेली तर विद्यमान आमदार सुनील राणेंचा पत्ता कट होणार आहे.
advertisement
लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी मिळाली नव्हती. तेव्हा भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांचं पुनर्वसन करण्याची विनंती मुंबईतील नेत्यांनी केलीय. गोपाळ शेट्टी यांना बोरिवलीतून उमेदवारी मिळावी असा आग्रह भाजप नेत्यांचा आहे. अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. पण आमदार सुनील राणे यांचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बोरिवली मतदारसंघाबाबत पुढील बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येतेय.
दिल्लीत भाजपच्या बैठकीत १०५ जागांवर चर्चा झाली. यात बोरिवली मतदारसंघातील भाजपचे आमदार सुनिल राणे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी विधासभेची तयारीसुद्धा सुरू केली आहे. गोपाळ शेट्टींसाठी भाजप नेते आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
गोपाळ शेट्टी हे मुंबई उत्तर मतदारसंघाचे खासदार होते. लोकसभेला गोपाळ शेट्टींचा पत्ता कट करून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली होती. गोपाळ शेट्टी याआधी बोरिवलीचे आमदारसुद्धा होते. २०१९ मध्ये ते विधासनभेला जिंकले होते.
