कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस असतो. त्यामुळे रेल्वेमार्गात दरड कोसळ्याची भीती असते. त्याचबरोबर दाट धुक्यांमुळे मोठा अपघात होण्याचीही शक्यता असते. बऱ्याचदा रेल्वेमार्ग खोळंबतो. कोकणात रेल्वनेच्या एकेरी वाहतुकीवर जास्त परिणाम होऊ नये म्हणून दरवर्षी वेळापत्रक ठरवले जाते. त्याचा एक विशिष्ठ कालावधी असतो. हा कालावधी 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत असतो. परंतु यावर्षी रेल्वेने पावसाळ्यातील कामे व्यवस्थित पार पाडल्यामुळे कोकण रेल्वे वेळापत्रकात सुधारणा केली. त्यामुळे 10 जून ऐवजी 15 जूनपासून पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. हा कालावधी 20 ऑक्टोबरपर्यंत होता. त्यानंतर रेल्वेचे नियमित वेळापत्रक लागू होणार आहे.
advertisement
मध्ये रेल्वेकडून सुटणाऱ्या गाड्या
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू जंक्शन (रोज)
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन कोकणकन्या एक्सप्रेस (रोज)
- लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी एक्सप्रेस (आठवड्यातून एकदा)
- दादर टर्मिनस ते सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस (रोज)
- लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव (आठवड्यातून 4 दिवस)
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव 'वंदे भारत' (आठवड्यातून 6 दिवस)
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्सप्रेस (रोज)
हे ही वाचा : बाप्पाचं आगमन आणि धो-धो कोसळणार पाऊस, 3 जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाचा अलर्ट
हे ही वाचा : Weather Alert: बाप्पाच्या आगमनाला धो धो पाऊस, मुंबई-ठाण्याला यलो अलर्ट, 27 ऑगस्टचा हवामान अंदाज