बाप्पाचं आगमन आणि धो-धो कोसळणार पाऊस, 3 जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाचा अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बाप्पाच्या आगमनासोबत मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी; काही जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ४० किमी आणि विजांचा इशारा.
बाप्पाचं आगमन जोरदार झालं आहे, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. आज 3 जिल्ह्यांसाठी 24 तास महत्त्वाचे असतील. याचं कारण म्हणजे या तीन जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. बाप्पाच्या आगमनासोबत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मुंबई आणि उपनगरात अधून-मधून जोरदार पाऊस सुरू आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस होणार आहे. या भागात ४० किमी वेगाने वारे वाहतील, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापुरातील काही भागात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.
advertisement
कोल्हापुरात घाटमाथ्यावर, सातारा, तळ कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 27, 2025 7:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बाप्पाचं आगमन आणि धो-धो कोसळणार पाऊस, 3 जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाचा अलर्ट