मिळालेल्या माहितीनुसार, कोचीजवळील समुद्रात दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी ही घटना घडली. मालवाहू जहाज लिबियाचे असल्याचं सांगितलं जात आहे. जहाज समुद्रातअर्धे बुडालं आहे. १८४ मीटर लांबीचं लायबेरियन ध्वज असलेलं कंटेनर जहाज MSC ELSA ३ हे २३ मे रोजी विझिंजम बंदरातून निघालं होतं. २४ मे रोजी कोची इथं पोहोचणार होतं.
पण २४ मे रोजी दुपारी १:२५ वाजता, मेसर्स MSC शिप मॅनेजमेंटने भारतीय अधिकाऱ्यांना कोचीच्या नैऋत्येस सुमारे ३८ नॉटिकल मैल अंतरावर जहाजाला अपघात झाला. समुद्रात आलेल्या लाटांनी जहाजाला नुकसान झालं. बघता बघता जहाज हे समुद्रात बुडालं.
घटनेची माहिती तातडीने भारतीय तटरक्षक दलाला देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव कार्य सुरू झालं. या भागात जहाजे आणि अडचणीत आलेल्या जहाजावर विमानांची नजर असते. या जहाजावर २४ कर्मचाऱ्यांपैकी ९ जण जहाज सोडून लाईफ बोटींमध्ये आहेत. तर उर्वरित १५ जणांना वाचवण्याचं बचावकार्य सुरू आहे.
जहाजाजवळ अतिरिक्त लाईफ बोटी टाकल्या आहेत. डीजी शिपिंगने भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने जहाज व्यवस्थापकांना जहाजाला तात्काळ बचाव सेवा पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जीवितहानी आणि वित्तहानी आणि नुकसान टाळण्यासाठी भारतीय तटरक्षक दल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.