अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाला टेकऑफनंतर भीषण अपघात झाला. हे विमान अवघ्या १० मिनिटात कोसळलं. विमान हे धावपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या एका मेडिकल कॉलेजच्या मेसवर कोसळलं. राज्य सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे हे ड्रीमलाइनर गेल्या २ दिवसांपासून अहमदाबादमध्ये होतं. विमानात दुरुस्ती केल्यानंतर या विमानाने आज लंडनला जाण्यासाठी निघालं होतं. पण अवघ्या १० मिनिटात विमानाला अपघात झाला.
advertisement
नेमकं काय घडलं?
12 जून 2025 रोजी, मेसर्स एअर इंडियाचे B787 विमान व्हीटी-एएनबी (अहमदाबाद ते गॅटविक) अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. विमानात 242 लोक होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. या विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांनी केले होते. अहमदाबदहून लंडनला निघालेलं विमान अवघ्या 10 मिनिटांत क्रॅश झालं. या विमानात 242 प्रवासी होते. 10 क्रू मेंबर, 2 लहान मुलं, 232 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाचं AI 171 विमान आज दुपारी क्रॅश झालं. विमानाचा मागचा भाग कोणत्या तरी गोष्टीला धडकल्याचं सांगितलं जात आहे. नेमका अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही. आतापर्यंत 30 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. टेकऑफनंतर 17 व्या मिनिटाला हे विमान हेलकावे खात खाली कोसळलं, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अपघात भीषण झाल्याचं दिसत आहे.