अडचणीत धावून आला भाऊ अन् वाचले प्राण
45 वर्षीय ईश्वर बाबुराव माने यांनी कावीळ झाली होती. शरीरारातील पेशींचे प्रमाण कमी झाले होते. उपचार करून काहीही फरक पडला नाही म्हणून त्यांनी पुण्यात येऊन तज्ज्ञ डाॅक्टरांकडून तपासणी केली. तेव्हा लक्षात आले की, त्यांचे लिव्हर पूर्णपणे काम निकामी झाले आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. भावाचे प्राण धोक्यात आले होते.
advertisement
असा भाऊ मिळणं माझं भाग्य आहे
यावेळी धावून आला तो त्यांला लहान भाऊ महादेव माने (वय-38), त्यांनी मोठ्या भावाला लिव्हर दान करण्याचं ठरवलं. त्यानंतर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. आज ऑपरेशनच्या 3 महिन्यांनतंर दोघेही भाऊ तंदुरुस्त आहेत. आपलं लिव्हर दान करून भावाला जीवनदान दिलं. लहान भाऊ महादेव माने म्हणतात की, "त्यावेळी माझ्या भावाचा जीव धोक्यात होता. मी लिव्हर दान केलं नसतं, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. मी माझ्या भावाला लिव्हर दान करून मी माझं कर्तव्य पार पाडलं." मोठे भाऊ ईश्वर माने सांगतात, "माझा जीव वाचण्यासाठी भावाने स्वतःच्या धोक्यात घातला. आज मी जे जगतोय, त्या माझ्या भावामुळेच. असा भाऊ मिळाला माझ्य भाग्य आहे"
हे ही वाचा : वर्गमित्राला Reels बववण्यासाठी हवी होती साडी; पण मैत्रिणीला गमवावा लागला जीव, कोल्हापूरात घडला भयंकर अपघात!
हे ही वाचा : पाऊस, धुकं आणि 2 महाकाय गव्यांची झुंज! आंबा घाटात निसरड्या कड्यावर घडला थरार, पण...
