TRENDING:

10 प्रवाशांना घेऊन विमान टेक ऑफ झाले, 24 तासानंतरही जमिनीवर उतरले नाही; कुठे गायब झाले?

Last Updated:

Bering Air Flight Missing: अलास्काच्या नोम परिसरात Bering Air फ्लाइट 445 हे विमान बेपत्ता झाले आहे. विमानाचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे. या विमानात एकूण १० प्रवासी होते, ज्यामध्ये ९ प्रवासी आणि १ पायलटचा समावेश आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: अलास्का येथे १० लोकांना घेऊन जाणारे विमान अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान १० जणांना घेऊन नोम येथे जात होते आणि अचानक त्याचा संपर्क तुटला आणि ते गायब झाले.
News18
News18
advertisement

बेरिंग एअरचे एक विमान उनालाक्लीट येथून नोमला जात होते. गुरुवारी ठरलेल्या वेळेत संध्याकळी ४ वाजता हे विमान नोम येथे पोहोचणार होते. मात्र विमानाचा अचानक संपर्क तुटला आणि ते गायब झाले. स्थानिक तसेच राज्यातील अधिकारी विमानाचा शोध घेत आहेत. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ४:०० वाजता AKRCC कडून एक विमान बेपत्ता झाल्याची माहिती AST ला देण्यात आली. या विमानाचे  शेवटचे लोकेशन दुपारी ३:१६ वाजता Bering Sea मधील Norton Sound भागात दिसले.

advertisement

प्रेमानंद महाराजांवर मथुरेतील लोक नाराज; अनुयायी आणि लोकांमध्ये झाली बाचाबाची

अलास्का स्टेट ट्रूपर्स आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा बोर्ड तसेच बचाव दल विमानाशी संपर्क झालेल्या शेवटच्या बिंदूपासून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नोम फायर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेरिंग विमानात ९ प्रवासी आणि एक पायलट होता. खराब हवामानामुळे आणि दृश्यता कमी झाल्याने अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

advertisement

संपूर्ण शहराचा नाश करणारा लघुग्रह, पृथ्वीवर कधी आदळणार; NASAने तारीखच सांगितली

आम्ही नोम आणि व्हाइट माउंटेन या परिसरात विमानाचा शोध घेत आहोत. दरम्यान शोध पथकातील अधिकाऱ्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, त्याने विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. कारण खराब हवामानामुळे अधिक लोक बेपत्ता होण्याची शक्यता आहे. शुक्रवार सकाळपर्यंत अधिकृतपणे या विमानाला अपघात झाल्याचे जाहीर करण्यात आले नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

गेल्या ९ दिवसात झालेली अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे. याआधी ६ फेब्रुवारी रोजी फिलिपाइन्समध्ये एका अमेरिकन कॉन्ट्रॅक्टेड विमानाचा अपघात होऊन ४ जण ठार झाले. तर गेल्या आठवड्यात वॉशिंग्टन DCच्या Reagan Airport जवळ US Army हेलिकॉप्टर आणि American Airlines च्या विमानाचा धडक होऊन ६७ जणांचा मृत्यू झाला होता.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
10 प्रवाशांना घेऊन विमान टेक ऑफ झाले, 24 तासानंतरही जमिनीवर उतरले नाही; कुठे गायब झाले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल