उद्ध्वस्त
बीएलएच्या मजीद ब्रिगेडने आत्मघाती हल्ला करत पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर बीएलएच्या ‘फतेह दस्ते’ने आणखी हल्ला केला, ज्यामुळे मृत सैनिकांची संख्या 90 झाली. हा ताफा 8 बसांमधून क्वेटाहून ताफ्तानकडे जात होता, त्यावेळी नोशकी येथील आरसीडी हायवेवर हा हल्ला झाला.
वर्ल्ड क्रिकेटमधील रेकॉर्ड; सचिनने जे केलं, ते आजवर कोणीच करू शकलं नाही
advertisement
बीएलएचे प्रवक्ते जीयंद बलोच यांनी निवेदन देत सांगितले की, या हल्ल्यासाठी विस्फोटकांनी भरलेले वाहन (VBIED) वापरण्यात आले. ताफ्यातील एका बसला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले, तर दुसऱ्या बसमधील सर्व सैनिकांना ‘फतेह दस्ते’ने ठार मारले." हल्ल्याची जबाबदारी बीएलएने स्वीकारली असून, लवकरच अधिक माहिती जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
हल्ल्यानंतर तातडीची मदतकार्य सुरू
हल्ल्यानंतर तातडीने तीन पाकिस्तानी हेलिकॉप्टर नोशकी येथे पाठवण्यात आले. तसेच, सर्व रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती लागू करण्यात आली असून, एफसी मुख्यालयाकडे रुग्णवाहिका धावत आहेत.
एका आठवड्यात दुसरा मोठा हल्ला
बलुचिस्तान प्रांतात एका आठवड्यात बीएलएचा हा दुसरा मोठा हल्ला आहे. याआधी मंगळवारी बलुच बंडखोरांनी बोलान परिसरात जाफर एक्सप्रेस ट्रेन पळवली होती. या घटनेनंतर तब्बल ३० तास सुरक्षा दल आणि बंडखोरांमध्ये संघर्ष सुरू होता.
पाकिस्तानी सैन्याने या घटनेत ३०० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याचा दावा केला आहे. तसेच, या मोहिमेत ३३ बंडखोर ठार झाल्याचे सैन्याने सांगितले. मात्र, बीएलएने २१४ प्रवाशांना ठार मारल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
