वर्ल्ड क्रिकेटमधील ऐतिहासिक रेकॉर्ड; 13 वर्षांपूर्वी सचिनने जे केलं, ते आजवर कोणीच करू शकलं नाही

Last Updated:

Sachin Tendulkar 100th Century: 16 मार्च 2012 रोजी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली होती. सचिनच्या बॅटमधून आलेले हे 100वे शतक होते. क्रिकेटच्या इतिहासात तोपर्यंत अशी कामगिरी कोणाला करता आली नव्हती आणि आज 13 वर्षानंतर हा विक्रम कोणाला मोडता आलेला नाही.

News18
News18
मुंबई: क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरने २४ वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय शतके झळकावली आहेत. वडिलांच्या निधनानंतर वर्ल्ड कपमध्ये केलेले शतक असो वा पाकिस्तानविरुद्ध कोलकातामध्ये १३६ धावांची खेळी, सचिनचे प्रत्येक शतक भारतीय क्रिकेटप्रेमींच्या हृदयात कोरले गेले. मात्र १६ मार्च २०१२ रोजी बांगलादेशविरुद्ध सचिनने जडवलेले शतक खास ठरले, कारण ते त्याच्या कारकिर्दीतील अखेरचे आणि ऐतिहासिक 100वे शतक होते.
मीरपूरमध्ये घडला ऐतिहासिक क्षण
बांगलादेशच्या मीरपूर येथील शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर सचिनने आपल्या कारकिर्दीतील शतकांची शंभरी पूर्ण करत क्रिकेट इतिहासात अजरामर कामगिरी केली. त्या सामन्यात सचिन फॉर्ममध्ये परतण्याची धडपड करत होता आणि अखेर १४७ चेंडूंमध्ये ११४ धावा फटकावत त्याने शतक साजरे केले. या खेळीत त्याने १४ चौकार आणि १ षटकार मारला.
advertisement
100 शतकांचा विक्रम
सचिनची ही खेळी त्याच्या नेहमीच्या आक्रमक शैलीपेक्षा वेगळी होती. त्याने ७७.५५ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, पण महत्त्वाचे म्हणजे, जगात आजवर कोणत्याही फलंदाजाने 100 शतकांचा विक्रम केला नव्हता. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात सचिनचा हा विक्रम ऐतिहासिक असा ठरला.
advertisement
भारताचा पराभव, पण...
सचिनच्या या ऐतिहासिक खेळीनंतर विराट कोहलीने ६६ आणि सुरेश रैनाने ५१ धावा जोडत भारताला ५० षटकांत ९ बाद २८९ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, बांगलादेशच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत चार चेंडू राखून सामना जिंकला. या पराभवामुळे भारतीय चाहत्यांना निराशा झाली, पण सचिनच्या विक्रमाने क्रिकेट जगतात इतिहास रचला.
advertisement
सचिनने आपल्या २०० कसोटी सामन्यांमध्ये १५,९२१ धावा आणि ४६३ एकदिवसीय सामन्यांत १८,४२६ धावा केल्या आहेत. कसोटीत ५१ आणि वनडेमध्ये ४९ शतके ठोकत सचिनच्या नावावर 100 शतकांचा विक्रम आहे.
सचिन सध्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग २०२५ मध्ये खेळत आहे. या स्पर्धेत सचिन भारतीय संघाचे नेतृत्व करत असून आज रविवारी भारताची लढत वेस्ट इंडिज संघाविरुद्ध रायपुरच्या शहीद वीर नारायण सिंह मैदानावर होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ल्ड क्रिकेटमधील ऐतिहासिक रेकॉर्ड; 13 वर्षांपूर्वी सचिनने जे केलं, ते आजवर कोणीच करू शकलं नाही
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement