Virat Kohli: निवृत्त झालो तरी तो एक सामना खेळण्यासाठी मैदानावर परत येईन; विराटचे मोठे वक्तव्य

Last Updated:

Virat Kohli: 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशामुळे विराट कोहलीने आनंद व्यक्त केला. यासाठी त्याने IPLचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. त्याच बरोबर भारतीय संघाला ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याच्या संधीबाबत विश्वास व्यक्त केला. तसेच महिला प्रीमियर लीगमुळे महिला क्रिकेटमध्ये मोठा बदल झाल्याचेही त्याने नमूद केले.

News18
News18
बेंगळुरू:  भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.  यासाठी त्याने इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) मोठे योगदान असल्याचे सांगितले आहे. 1900 पॅरिस ऑलिम्पिकनंतर प्रथमच क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले आहे.

IPLमुळे क्रिकेटला जागतिक मान्यता

RCB इनोव्हेशन लॅब टॉक शोमध्ये बोलताना कोहली म्हणाले, ऑलिम्पिक चॅम्पियन बनणे हा एक अविस्मरणीय अनुभव असेल. क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देण्यात IPLचा मोठा वाटा आहे. या स्पर्धेमुळे क्रिकेटने नवा स्तर गाठला आहे आणि आता ते ऑलिम्पिकमध्ये दिसणार आहे. आमच्या काही खेळाडूंसाठी हे मोठे संधीचे व्यासपीठ असणार आहे.
advertisement

पुरुष आणि महिला संघासाठी सुवर्णसंधी

कोहली पुढे म्हणाला, आमच्या खेळाडूंसाठी हा पहिलाच अनुभव असेल. मला खात्री आहे की आम्ही (पुरुष आणि महिला संघ दोघेही) पदकाच्या खूप जवळ असू.

कोहली ऑलिम्पिकमध्ये खेळणार?

2028 ऑलिम्पिकमध्ये कोहलीचे वय 40 वर्षे असेल, त्यामुळे त्यांचे खेळणे कठीण आहे. यावर विनोदी शैलीत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये खेळेन की नाही माहीत नाही, पण जर आम्ही (भारतीय संघ) सुवर्णपदकासाठी खेळत असू, तर मी एक सामना खेळून पदक घेऊन परत येईन.
advertisement

महिला प्रीमियर लीगचा प्रभाव

महिला क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दलही कोहली यांनी आपली मते मांडली. महिला प्रीमियर लीगमुळे मोठा बदल झाला आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलत आहे. तसेच इतर खेळांमध्येही भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यांना देशाकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

मैदानावरील आक्रमकतेवर...

advertisement
मैदानावर आपली भावना स्पष्टपणे व्यक्त करणे ही आता सवय बनल्याचे कोहलीने सांगितले. मी कधीही हे लपवले नाही की, मी भावनिक होतो. माझी स्पर्धात्मक वृत्ती तशीच आहे. काही जण यावर टीका करतात, पण अनेकांना माझी ही आक्रमकता आवडते, असे तो म्हणाला.

IPL ते ऑलिम्पिक 

IPLच्या जागतिक लोकप्रियतेमुळेच क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले आहे, असे विराटच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. क्रिकेटप्रेमींसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून, भारतीय संघ सुवर्णपदक जिंकण्यासाठी किती सज्ज असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल!
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli: निवृत्त झालो तरी तो एक सामना खेळण्यासाठी मैदानावर परत येईन; विराटचे मोठे वक्तव्य
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement