हल्ल्याचा घटनाक्रम
मंगळवारी बलुचिस्तानमध्ये पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला करण्यात आला. अतिरेक्यांनी सुमारे 450 प्रवाशांना ओलीस धरले, ज्यात महिला आणि मुले देखील होती. मात्र, काही वेळाने सर्व सामान्य नागरिकांना सोडून देण्यात आले, पण 182 लोकांना ओलीस ठेवण्यात आले, ज्यामध्ये सैन्याचे जवान मोठ्या संख्येने होते.
advertisement
लष्कराची बचावमोहीम अपयशी
ओलिसांची सुटका करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने मोठे अभियान राबवले. मात्र, BLA च्या विद्रोह्यांनी तीव्र प्रतिकार करत 150 सैनिकांचा बळी घेतला. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून सरकारला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा हल्ला: पाकिस्तानी सैनिक ठार, ड्रोन पाडले
बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने मोठा हल्ला करत पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आणि एक लष्करी ड्रोन देखील पाडले, असा दावा संघटनेने केला आहे.पाकिस्तानी लष्कराने ओलिसांची सुटका करण्यासाठी मोहीम राबवली, मात्र त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. BLA ने सैनिक मारल्याचा दावा केला असून, लष्कराच्या ड्रोन्सलाही लक्ष्य केले जात आहे.
कोण आहेत बलूच? पाक लष्कराला थेट धमकी, कारवाई केली तर 500 जण आमच्या ताब्यात
बलुचिस्तानमधील असंतोष तीव्र
बलुचिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू आहे. BLA सारख्या संघटना पाकिस्तानविरोधात सशस्त्र लढा देत आहेत. हा हल्ला त्या संघर्षाचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पाकिस्तानसमोरील अंतर्गत सुरक्षेचे आव्हान आणखी गडद झाले आहे. ही घटना पाकिस्तानी लष्कर आणि सरकारसाठी मोठा धक्का असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
