Pakistan Train Hijack: BLAने पाकिस्तान लष्कराचा गळाच धरला, दुर्गम डोंगराळ प्रदेशात ट्रेन हायजॅक; ग्राउंड झिरोवरून Special रिपोर्ट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Pakistan Train Hijack: बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने डोंगराळ प्रदेशात प्रवासी रेल्वे हायजॅक केली आहे. या घटनेने पाकिस्तान लष्कराचे धाबे दणाणले आहेत. संबंधित ठिकाण दुर्गम डोंगराळ प्रदेशात असल्याने सहजा सहजी शक्य नाही.
क्वेटा: पाकिस्तानातील बलुच बंडखोरांनी 400 प्रवाशांना घेऊन जाणारी जाफर एक्सप्रेस ताब्यात घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेनमध्ये पाकिस्तानी लष्कराचे सैनिक आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे अनेक अधिकारी उपस्थित आहेत. या ट्रेनमध्ये सामान्य प्रवासीही प्रवास करत होते. त्यात क्वेट्टा येथील लष्करी अधिकारी बसले होते असे सांगितले जात आहे. क्वेट्टा हे पाकिस्तानच्या प्रमुख लष्करी तळांपैकी एक आहे. त्यामुळे या ट्रेनमध्ये अनेक महत्त्वाचे लोक असतील असे मानले जाते.
बलूचिस्तानच्या दुर्गम डोंगराळ प्रदेशात हायजॅक झालेल्या प्रवासी ट्रेनला वाचवण्यासाठी मोठे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सिबी आणि क्वेटा येथील रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली असून, घटनास्थळी रुग्णवाहिका आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
दुर्गम भागामुळे बचाव कार्यात अडथळे
बलूचिस्तान सरकारच्या निवेदनानुसार, रेल्वे विभागाने बचाव कार्यासाठी अधिक गाड्या घटनास्थळी पाठवल्या आहेत. मात्र, घटनास्थळाचा भूभाग अत्यंत खडतर असल्यामुळे आणि डोंगराळ भागात असल्यामुळे सुरक्षा दलांना तिथे पोहोचण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. या हल्ल्याचा अभ्यास केला जात आहे आणि यात दहशतवादी गट सहभागी आहेत का, याचा तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बलूचिस्तान सरकारने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत आणि तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
advertisement
पाकमध्ये दहशतवादी हल्ला, प्रवासी ट्रेन हायजॅक; १०० हून अधिक प्रवाशांना ओलीस
रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर
हेल्थ डिपार्टमेंटचे प्रवक्ते डॉ. वसीम बैग यांनी सांगितले की, सिव्हिल हॉस्पिटल क्वेटामध्ये तातडीची परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, सर्व डॉक्टर, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
advertisement
गोंधळ रोखण्यासाठी सरकारचा इशारा
सरकारी प्रवक्त्याने जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि परिस्थितीबाबत अधिकृत निवेदनांचीच वाट पहा, असे आवाहन करण्यात आले आहे.घटनास्थळी तणाव कायम असून, बचाव पथके घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान रेल्वे आणि सुरक्षादलांकडून कोणत्याही क्षणी अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 11, 2025 4:56 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Pakistan Train Hijack: BLAने पाकिस्तान लष्कराचा गळाच धरला, दुर्गम डोंगराळ प्रदेशात ट्रेन हायजॅक; ग्राउंड झिरोवरून Special रिपोर्ट


