Pakistan Train hijack: पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, प्रवासी ट्रेन हायजॅक; 6 जवान ठार, 100 हून अधिक प्रवाशांना ओलीस

Last Updated:

Pakistan Train hijack: पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात मंगळवारी एक प्रवासी ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी होते. बलूचिस्तानमधील वेगळावादी गट बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने जबाबदारी स्वीकारत, ट्रेनवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.

News18
News18
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात मंगळवारी एक प्रवासी ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे ४०० प्रवासी होते. बलूचिस्तानमधील स्वतंत्र गट बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत, ट्रेनवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. गटाने केलेल्या दाव्यानुसार, या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे सहा जवान ठार झाले असून, त्यानंतर 100 हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले की, ही ट्रेन पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलूचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वाच्या पेशावरकडे जात असताना हल्ला करण्यात आला.
BLA चा दावा – ओलीसांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे जवान
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारविरोधात दीर्घकाळ लढणाऱ्या BLA या गटाने ट्रेन हायजॅक केल्यानंतर निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी सांगितले की, ओलीसांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे जवान आणि सुरक्षा एजन्सीचे सदस्य आहेत. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ओलीसांना गंभीर इजा पोहोचू शकते, असा इशारा BLA ने दिला आहे.
advertisement
BLA ने सांगितले की, त्यांनी ट्रेनमधील महिला, मुले आणि बलूच प्रवाशांना सोडून दिले असून, ओलीस ठेवलेले सर्वजण पाकिस्तानी सैन्याशी संबंधित आहेत.
द बलुचिस्तान पोस्टच्या अहवालानुसार, बीएलएने गेल्या वर्षी 302 हल्ले केले होते ज्यामध्ये 580 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि 370 जण जखमी झाले. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) आणि बलुच राजी आजोई संगर (बीआरएएस) सारख्या इतर गटांनीही 2024 मध्ये शेकडो हल्ले केले ज्यामुळे एकूण 1 हजार हून अधिक लोक मृत्युमुखी पडले.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Pakistan Train hijack: पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, प्रवासी ट्रेन हायजॅक; 6 जवान ठार, 100 हून अधिक प्रवाशांना ओलीस
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement