पूर्णिया, 14 ऑक्टोबर : येत्या 28 ऑक्टोबरला चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतासह इतर अनेक देशांमधून दिसेल. काही राशीच्या व्यक्तींसाठी हे ग्रहण आनंद घेऊन येईल, तर काही राशीच्या व्यक्तींसाठी मात्र अडचणी. परंतु घाबरू नका, या अडचणींवर उपायही जाणून घेऊया.
बिहारच्या पूर्णियाचे ज्योतिषी पंडित मनोत्पल झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 1 वाजून 5 मिनिटांपासून ते 2 वाजून 24 मिनिटांपर्यंत चंद्रग्रहण असेल. या ग्रहणाच्या 9 तासांपूर्वी सुतक काळ सुरू होईल. या कालावधीत स्वयंपाक बनवून ठेवू नये. शिवाय ग्रहण काळात जेवणही करू नये. तर, ग्रहण समाप्तीनंतर आंघोळ करून महादेवाची पूजा करावी आणि गरजवंतांना दान द्यावं, असं ज्योतिषांनी सांगितलं.
advertisement
नवरात्री लाभणार! बुध ग्रहाचा तूळप्रवेश सुख घेऊन येणार, यात आहे का तुमची रास?
त्याचबरोबर ते म्हणाले, हे चंद्रग्रहण मिथुन आणि कन्या राशीसाठी विशेष लाभदायी ठरेल. तर, 31 ऑक्टोबरनंतर मेष राशी राहूपासून मुक्त होणार असल्याने या राशीच्या व्यक्तींनाही विशेष लाभ होईल. धनू आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठीदेखील 31 ऑक्टोबरनंतरचा काळ प्रचंड लाभदायक असेल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठीही चांगले दिवस येतील.
त्या जखमा आजही ओल्या! 'सती'त स्वत:ला संपवलेल्या महिलांची होते पूजा
याव्यतिरिक्त इतर राशींच्या व्यक्तींसाठी हे चंद्रग्रहण सकारात्मक ठरेल, मात्र त्यांना काही चढ-उतारदेखील पाहायला मिळतील. ज्योतिषांच्या माहितीनुसार, चंद्रग्रहणात सर्व अडचणींवर मात करण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे महादेवांची मनोभावे पूजा करणं. सोबतच ओम चंद्र चंद्राय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करावा. शिवाय आपण महामृत्यूंजय जपदेखील करू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g