त्या जखमा आजही ओल्या! 'सती'त स्वत:ला संपवलेल्या महिलांची होते पूजा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ही अनिष्ट प्रथा क्रातिकारकांनी हाणून पाडली आणि पुढे असंख्य स्त्रियांचं आयुष्य वाचवलं.
पीयूष शर्मा, प्रतिनिधी
मुरादाबाद, 13 ऑक्टोबर : आपल्या भारतात अशा अनेक प्राचीन वास्तू आहेत, ज्या आपला इतिहास सांगतात. अनेक वर्षांपूर्वी देशात सती प्रथा होती. ज्यात स्त्रिया नवऱ्याच्या चितेत स्वतःला संपवून घ्यायच्या. ही अनिष्ट प्रथा क्रातिकारकांनी हाणून पाडली आणि पुढे असंख्य स्त्रियांचं आयुष्य वाचवलं.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद भागातही मोठ्या प्रमाणात महिलांनी नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेत स्वतःला जाळून घेतलं. या घटनांची खूण आजही पाहायला मिळते. ज्यांनी सती प्रथेत आयुष्य संपवलं होतं, त्या महिलांचे मठ याठिकाणी आढळतात. तिथे लोक आजही पूजा करतात.
advertisement
या मठांबाबत लोक सांगतात की, आमच्या पूर्वजांच्या माहितीनुसार, सती जाणाऱ्या महिलांच्या अस्थी ठेवून हे मठ बांधण्यात आले होते. अगवानपूर आणि कटघर भागात सतींचे मठ आहेत. 60 वर्षांपूर्वी इथे अनेक मठ होते, ज्यांपैकी बरेचसे आज अस्तित्त्वात नाहीत.
advertisement
इतिहासकार डॉ. अजय अनुपम सांगतात की, 'पूर्वी कमी वयाच्या मुलींची लग्न मोठ्या पुरुषांसोबत केली जायची. त्यामुळे वयोमानानुसार आधी मरण येणाऱ्या नवऱ्याच्या अग्नीत आपली काहीही चूक नसताना महिलांना स्वतःला जाळून घ्यावं लागत असे. मृत्यूनंतर या महिलांच्या अस्थी भिंतींखाली दडवून ठेवल्या जात. तिथे मठ बांधले जात असत. यापैकी अनेक मठ आज अस्तित्त्वात नाहीत, मात्र अनेक मठांमध्ये आजही पूजा केली जाते.'
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
Location :
Moradabad,Uttar Pradesh
First Published :
October 13, 2023 11:51 PM IST