'थामा' या चित्रपटाच्या 'पॉइजन बेबी' या नव्या गाण्यात मलायका अरोरा आणि रश्मिका मंदाना दोघीही प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. हे गाणं जॅस्मिन सैंडलस, सचिन-जिगर आणि दिव्या कुमार यांनी गायलं आहे. गाण्याची सुरुवात मलायकाच्या दमदार डान्सने होते, त्यानंतर आयुष्मान खुरानाच्या पात्राची एन्ट्री होते आणि मग रश्मिका मंदानाही झळकते.
...अन् चाहत्यानं 2 बाय 4च्या टाइलवर घेतली ऑटोग्राफ, गलबलून गेल्या वंदना गुप्ते; सांगितला गडकरी रंगायतनच्या मेकअप रुममचा किस्सा
advertisement
'थामा' हा एक रोमँटिक-कॉमेडी हॉरर चित्रपट असून, तो मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा पाचवा भाग आहे. आदित्य सरपोतदारने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पटकथा नीरेन भट्ट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फलारा यांनी लिहिली आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यांच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. 'थामा' ही अनोख्या प्रेमकथेवर आधारित आहे, ज्यात आयुष्मान खुराना रश्मिकाशी भेटल्यानंतर व्हँपायर बनतो आणि त्याला अलौकिक शक्ती प्राप्त होतात. ‘थामा’ हा चित्रपट 21 ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
नोरा फतेहीचं गाणंही ठरलं होतं हिट
‘थामा’ चित्रपटातील ‘दिलबर की आँखों का’ हे गाणं याआीधी प्रदर्शित झालं होतं. यामध्ये नोरा फतेही दिसली होती. हे गाणं रश्मीत कौर आणि जिगर सरैया यांनी गायलं होतं. तर त्याचे बोल प्रसिद्ध गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले होते. संगीत सचिन-जिगर या जोडीने दिलं आहे. नोरा फतेहीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं होतं की गाणं रिलीज झाल्यानंतर केवळ 10 मिनिटांत 1.2 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. व्हिडिओमध्ये ती उत्साहाने म्हणाली होती,"माझ्या फॅन्सकडून मिळणाऱ्या प्रेमाने मन आनंदून गेलं आहे. गाणं रिलीज होताच रेकॉर्ड ब्रेक करत आहे. गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून प्रेक्षकांना आता चित्रपटाची प्रतीक्षा आहे.