...अन् चाहत्यानं 2 बाय 4च्या टाइलवर ऑटोग्राफ घेतली, गलबलून गेल्या वंदना गुप्ते; सांगितला गडकरी रंगायतनच्या मेकअप रुमचा किस्सा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Vandana Gupte Autograph : ठाण्याच्या गडकरी रंगायतन या नाट्यगृहात अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या नाटकाचा प्रयोग होता. तेव्हा एक चाहता त्यांना भेटायला आला अन् त्याने एका फरशीवर त्यांची ऑटोग्राफ घेतली.
कलाकार म्हटलं की चाहते त्यांना भेटायला येतात. त्यांच्या कामाचं कौतुक करतात. हल्ली कलाकारांबरोबर सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी असते. असं असलं तरी ऑटोग्राफ घेण्यासाठीही चाहते गर्दी करतात. नाटकाच्या प्रयोगानंतर ग्रीन रुममध्ये कलाकारांना भेटण्यासाठी चाहत्यांनी रांग लागलेली असते. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या नाटकादरम्यान एका चाहत्याने यांच्याकडून ऑटोग्राफ घेतली आणि पुढे जे सांगितलं ते ऐकून वंदना गुप्तेही भारावून गेल्या. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित नेमकं काय झालं हे सांगत भावना व्यक्त केल्या.
अभिनेत्री वंदना गुप्ते सध्या कुटुंब कीर्तन या नाटकात काम करत आहेत. या नाटकात त्यांच्याबरोबर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि तन्वी मुंडले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात हाऊसफुल्ल प्रयोग सुरू आहेत. या नाटकाचा प्रयोग नुकताच ठाण्यात पार पडला. ठाण्याच्या गडकरी रंगायतन या नाट्यगृहात नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग रंगला. या प्रयोगाच्या नंतर वंदना गुप्ते यांना एक चाहता भेटण्यासाठी आला. तो अनुभव त्यांनी पोस्टमधून शेअर केली आहे.
advertisement
वंदना गुप्ते यांनी चाहत्यांसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "आज ठाण्याला 'गडकरी रंगायतन'ला कुटुंब कीर्तन नाटकाचा प्रयोग होता. मेकअप रूममधे एक गृहस्थ माझी सही घ्यायची म्हणून भेटायला आले. त्यांनी एका 2 बाय 4 च्या टाइल वर माझी सही घेतली."
advertisement
"मला जरा आश्चर्य वाटलं म्हणून मी कारण विचारलं. ते म्हणाले 'गडकरी रंगायतन हे ठाण्याच वैभव आहे. जिथे अनेक महान कलाकार आपली कला सादर करत आले. त्या रंगमंदिराचे नूतनीकरण करताना मी त्यातल्या फरश्या 3-4 गोणी भरून घरी घेऊन आलो. मी माझ्या आवडत्या कलाकारांची सही ह्यावर घेऊन ठेवतो. माझ्या घराची एक भिंत ह्या साह्यांनी भरलेली असेल. आणि ती माझ्यासाठी एक ऐतिहासिक, मौल्यवान आठवण असेल."
advertisement
"मला खूप गलबलून आलं ते ऐकून. किती प्रेम करतात आमच्या कलेवर लोक. खरं तर असे प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही रंगमंचावर टिकून आहोत. बालगंधर्व उगाच नाही प्रेक्षकांना मायबाप म्हणत असत."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 8:40 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
...अन् चाहत्यानं 2 बाय 4च्या टाइलवर ऑटोग्राफ घेतली, गलबलून गेल्या वंदना गुप्ते; सांगितला गडकरी रंगायतनच्या मेकअप रुमचा किस्सा